Atul Save News: मंत्री अतुल सावे यांच्या माजी ओएसडीवर गुन्हा; पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न, मुलालाही बॅटने मारहाण?

Pune Crime News: विजय कारंडे हे मोबाईलवर चॅटिंग करत असताना त्यांच्या ३० वर्षीय पत्नीने त्याबाबत विचारणा केली आणि मोबाईलचा पासवर्ड मागितला. या कारणावरून कारंडे यांनी पत्नीला मारहाण केली.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या राजकारणातून आणि प्रशासकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महायुती सरकारमधील भाजपचे कॅबिनेट मंत्री यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय धुलचंद कारंडे यांच्यावर पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कारंडे यांनी आपल्या लहान मुलालाही बॅटने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

ही घटना ३० एप्रिल रोजी सायंकाळी पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थानी घडली. विजय कारंडे हे मोबाईलवर चॅटिंग करत असताना त्यांच्या ३० वर्षीय पत्नीने त्याबाबत विचारणा केली आणि मोबाईलचा पासवर्ड मागितला. या कारणावरून कारंडे यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. कारंडे यांनी रागाच्या भरात पत्नीला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी पत्नीचा गळा आवळून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आईला वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा मध्ये पडला असता, आरोपीने पोटच्या मुलालाही सोडले नाही आणि त्याच्यावरही बॅटने हल्ला चढवला. असे तक्रारी नमूद करण्यात आले आहे.

Pune Crime News
Pune Collector Action: प्रशासनाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 15 जमिनी जप्त; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; जमीन माफियांचे धाबे दणाणले!

या हल्ल्यातून महिलेने स्वतःचा बचाव केला आणि मुलासह घरातून बाहेर पडून धाव घेतली. आणि तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हा गुन्हा आता पुण्याच्या कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News
Thalapathy Vijay News: ‘थलपती’ CM होणार? भाजप खासदार हेमा मालिनी यांचा मोठा दावा

कोण आहेत विजय कारंडे?

विजय कारंडे हे मूळचे नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत आहेत. सध्या ते मुंबईतील मंत्रालयात ओबीसी कल्याण, दुग्धविकास आणि अक्षय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. अतुल सावे यांच्या कार्यालयातून माहिती घेतली असता कारंडे यांनी 15 दिवसांपूर्वीच कौटुंबिक कारणास्तव काम सोडले असल्याचे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com