Suvendu Adhikari Swearing-In | Subrata Gupta Appointment Sarkarnama
देश

Subrata Gupta Appointment : बंगालमध्ये भाजप सरकार येताच निवडणूक आयोगाने नेमलेल्या अधिकाऱ्याची बढती; थेट मुख्यमंत्र्यांच्या जवळ नेऊन बसवलं...

West Bengal administrative changes : डॉ. सुब्रत गुप्ता हे पश्चिम बंगाल कॅडरचे १९९० च्या तुकडीचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान, निवडणूक आयोगाने त्यांची 'विशेष मतदार यादी निरीक्षक' म्हणून नियुक्ती केली होती.

Jagdish Patil

Subrata Gupta Appointment : भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी (ता.९) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुवेंदू यांच्या शपथविधीनंतर राज्यात भाजप सरकारची स्थापना होताच बंगालमध्ये मोठे प्रशासकीय बदल करण्यात येत आहेत.

त्यानुसार, निवृत्त IAS अधिकारी डॉ. सुब्रत गुप्ता यांची पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुब्रत गुप्ता यांच्या नियुक्तीबाबतची अधिकृत अधिसूचनाही राज्य सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने सुब्रत गुप्ता यांची पश्चिम बंगालमध्ये 'विशेष भूमिका निरीक्षक' म्हणून नियुक्ती केली होती. मतदार यादीच्या 'विशेष सखोल पुनरीक्षणा'पासून (SIR) ते २०२६ च्या विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत, त्यांनी या बंगालमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

अशातच आता त्यांची थेट मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारपदी वर्णी लागल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. तर निवडणूक आयोगाने २०२६ मध्ये नियोजित असलेल्या बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मतदार यादीच्या 'विशेष सखोल पुनरीक्षणावर देखरेख करण्यासाठी नोव्हेंबर २०२५ मध्येच सुब्रत गुप्ता यांची बंगालचे 'विशेष मतदार यादी निरीक्षक' म्हणून नियुक्ती केली होती.

कोण आहेत सुब्रत गुप्ता?

डॉ. सुब्रत गुप्ता हे पश्चिम बंगाल कॅडरचे १९९० च्या तुकडीचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान, निवडणूक आयोगाने त्यांची 'विशेष मतदार यादी निरीक्षक' म्हणून नियुक्ती केली होती. तर बंगालमधील निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आयोगाने ७ मे रोजी त्यांना या जबाबदारीतून मुक्त केलं.

राज्यपालांनी दिली मंजुरी

दरम्यान, सुब्रत गुप्ता यांच्या नियुक्तीबाबतची अधिकृत अधिसूचना पश्चिम बंगाल सरकारकडून शनिवारी (ता.९) जारी आली आहे. या अधिसूचनेत पश्चिम बंगालचे राज्यपाल रवींद्र नारायणन रवी (आर. एन. रवी) यांनी सुब्रत गुप्तांच्या नियुक्तीस मंजुरी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT