Vijay vs Stalin news : CM विजय यांच्यावर 2 तासांतच स्टॅलिन यांचा पहिला वार; विधानसभेत बहुमत सिध्द करण्याआधीच सुरू झाला 'खेला'

CM Vijay news, MK Stalin attack : तुमच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूच्या प्रगतीचा प्रवास अधिक वेगाने पुढे जावो, अशा शब्दांत एम. के. स्टॅलिन यांनी विजय यांना शुभेच्छाही दिल्या.
Vijay and M. K. Stalin at the center of a fresh political confrontation as accusations begin ahead of the Tamil Nadu Assembly floor test. (AI Image)
Vijay and M. K. Stalin at the center of a fresh political confrontation as accusations begin ahead of the Tamil Nadu Assembly floor test. (AI Image)Sarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu political clash : तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर सी. जोसेफ विजय यांनी चार महत्वाचे निर्णय घेतले. २०० यूनिटपर्यंत मोफत वीज, महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र दल आणि प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्जविरोधी युनिट सुरू करण्याच्या फायलींवर त्यांनी सही केली. त्यासोबतच मागील सरकारच्या काळातील आर्थिक स्थितीवर व्हाईट पेपर काढण्याची घोषणा विजय यांनी केली. या घोषणेवरून आता राजकारण तापण्यास सुरूवात झाली झाली आहे.

विजय यांनी शपथ घेतल्यानंतर उपस्थितांसमोर पहिले भाषण केली. यावेळी त्यांनी राज्यातील आर्थिक स्थितीचा आढावा घेताना मागील सरकारवर आरोप केले. मागील सरकारने आपल्यावर १० लाख कोटींच्या कर्जाचा बोजा टाकल्याचे ते म्हणाले. विजय यांच्या या आरोपांवर माजी मुख्यमंत्री व डीएमके प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी लगेचच प्रत्युत्तर दिले आहे.

स्टॅलिन यांनी सोशल मीडियात पोस्ट करत विजय यांना शुभेच्छा देतानाच त्यांच्या घोषणेचाही समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सूत्रे हाती घेताच तुम्ही लगेच केलेल्या घोषणांचे मी स्वागत करतो. आता सरकारकडे पैसे नाहीत, असे सांगायला सुरूवात करू नका. पैसा आहे, पण गरज आहे ती तो पैसा जनतेसाठी खर्च करण्याच्या इच्छाशक्तीची आणि प्रभावीपणे सरकार चालविण्याच्या क्षमतेची, असा टोला स्टॅलिन यांनी लगावला आहे.

Vijay and M. K. Stalin at the center of a fresh political confrontation as accusations begin ahead of the Tamil Nadu Assembly floor test. (AI Image)
CM Vijay news : मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार हाती घेताच विजय यांचे 4 धडाकेबाज निर्णय; राहुल गांधींसमोरच स्टॅलिन यांना दिला पहिला झटका

कोविड, पूरस्थिती आणि केंद्रातील भाजप सरकारकडून दुर्लक्ष होत असतानाही आम्ही मागील पाच वर्षांत जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे. मागील सरकारने १० लाख कोटी रुपयांचे कर्ज ठेवून तिजोरी रिकामी केल्याचा आरोप तुम्ही पहिल्याच भाषणात केला.मात्र राज्यावरील कर्ज हे निकषाच्या मर्यादेतच आहे. फेब्रुवारी महिन्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारची आर्थिक स्थिती मांडली होती. ते तुम्हाला माहिती नव्हते का? त्यानंतरच तुम्ही जनतेला आश्वासने दिलीत ना? तुम्हाला मतदान केलेल्या जनतेची फसवणूक करू नका. तसेच मुद्दा भटकविण्याचाही प्रयत्न करू नका, असे सवासही स्टॅलिन यांनी केले.

Vijay and M. K. Stalin at the center of a fresh political confrontation as accusations begin ahead of the Tamil Nadu Assembly floor test. (AI Image)
विद्यमान मुख्यमंत्र्यांचा सलग दोनदा पराभव अन् देशात इतिहास घडला...

पूर्ण करता येतील अशीच आश्वासने देणार असल्याचे सांगत तुम्ही सत्तेत आला आहात. आता प्रशासनात पहिले पाऊल टाकत असताना जनतेला दिलेली आश्वासने कशी पूर्ण करायची, याचे बारकावे लवकर शिकाल, असा मला विश्वासही स्टॅलिन यांनी व्यक्त केला. तुमच्या पक्षाला मतदान करणाऱ्या जनतेसोबत मलाही अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. शेवटी तुमच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूच्या प्रगतीचा प्रवास अधिक वेगाने पुढे जावो, अशा शब्दांत स्टॅलिन यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com