Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee Resigns : विधानसभा निवडणुकीपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये मोठी घडामोड! मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी दिला 23 पदांचा राजीनामा

West Bengal CM Mamata Banerjee resignation : राज्य प्रशासनाच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात विविध मंडळे, परिषदा आणि आयोगांवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून काम केलेल्या ममता बॅनर्जी यांनी या पदांचा राजीनामा दिला आहे.

Jagdish Patil

Mamata Banerjee Resigns : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी आपल्या २३ पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये मोठी खळबल उडाली आहे. त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

राज्य गृह विभागाने पाठवलेल्या पत्रात, राज्य सरकारमधील संबंधित विभागांना मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात ज्या पदांचा उल्लेख केला आहे त्या पदांवरील त्यांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्य प्रशासनाच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळात विविध मंडळे, परिषदा आणि आयोगांवर अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून काम केलेल्या ममता बॅनर्जी यांनी या पदांचा राजीनामा दिला आहे. कारण ही पदे त्यांच्या घटनात्मक आणि मंत्रिपदाशी संबंधित जबाबदाऱ्यांपेक्षा वेगळी असून यातील काही पदे अशी आहेत जी एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवू शकतात.

नियमांनुसार, उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अशा पदांचा राजीनामा देणे आवश्यक असते. आणि यामुळेच ममता यांनी २३ पदांचा राजीनामा दिला आहे. कारण नंतर उमेदवारी भरताना कोणतीही अडचण येऊ नये. ममता बॅनर्जी या दक्षिण कोलकाता येथील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

त्यांच्या विरोधात या ठिकाणाहून राज्याचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी निवडणूक लढवत आहेत. तर ममता बॅनर्जी यांनी राज्य आरोग्य अभियानाचे प्रमुख, राज्य वन्यजीव मंडळ व पर्यावरण-पर्यटन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष, नेताजी सुभाषचंद्र बोस १२५ वी जयंती समितीचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगाल उर्दू अकादमीच्या नियामक मंडळ, अशा विविध पदांचा राजीनामा दिला.

यासह त्यांनी 'बांगला संगीत मेळा'च्या आयोजन समितीचे अध्यक्षपद आणि 'राज्य अनुसूचित जाती व जमाती सल्लागार परिषदे'चे प्रमुखपद या पदांचाही राजीनामा दिला. या सर्व पदांशी संबंधित राजीनामे स्वीकारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT