West Bengal Exit Poll Sarkarnama
देश

West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालच्या ‘एक्झिट पोल’मध्ये मोठा ट्विस्ट; ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ची माघार, कारण ठरले मतदार...

Axis My India withdrawal, Bengal election survey news : मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बहुतेक एजन्सीने भाजपला झुकते माप दिले आहे. राज्यात भाजपचीच सत्ता येईल, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत.

Rajanand More

Exit poll controversy India : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी सायंकाळी विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर आले. बहुतेक संस्थांनी राज्यात भाजपची सत्ता येईल, असा अंदाज वर्तविला आहे. पण तृणमूल काँग्रेसकडूनही भाजपला जोरदार टक्कर दिली जाईल, असेही एक्झिट पोलमधील आकड्यांवरून दिसते. त्यामुळे नेमका निकाल काय लागणार याबाबत संभ्रम वाढलेला आहे. त्यातच आता बऱ्यापैकी अचूक अंदाज वर्तविणाऱ्या अ‍ॅक्सिस माय इंडिया या एजन्सीने एक्झिट पोल प्रसिध्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.

'अ‍ॅक्सिस माय इंडिया' या एजन्सीचे अनेक एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले आहे. त्यामुळे या एजन्सीच्या एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष असते. एजन्सीकडून बुधवारी तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदु्च्चेरी या चार राज्यांचे अंदाज करण्यात आले. पण बंगालचे आकडे गुरूवारी सायंकाळी पाच वाजता जारी केले जातील, असे सांगण्यात आले होते.

आता एजन्सीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांनी एक्झिट पोल जारी करणार नसल्याचे सांगितले आहे. एनडीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. प्रदीप गुप्ता यांनी सांगितले आहे की, बंगालमधील अनेक मतदारांनी यावर बोलण्यास नकार दिला. हे प्रमाण ६० ते ७० टक्के एवढे आहे. अशावेळी एक्झिट पोलचे आकडे जारी करणे योग्य ठरणार नाही. मतदारांना बोलायचे नाही. त्यामुळे काहीही आकडे देऊन आम्ही आमची प्रतिमा मलीन करू इच्छित नाही.

दरम्यान, बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले असून दोन्ही टप्प्यात मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मतदारांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहेत. पहिल्या टप्प्यात ९३.१९ तर दुसऱ्या टप्प्यात ९१.६६ टक्के एवढे मतदान झाले आहे. दोन्ही टप्प्यातील एकत्रित मतदान ९२.४७ एवढे आहे. बंगाल निवडणुकीच्या इतिहासातील हे सर्वाधिक मतदान ठरले आहे.

दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बहुतेक एजन्सीने भाजपला झुकते माप दिले आहे. राज्यात भाजपचीच सत्ता येईल, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. दोन्ही पक्षांमधील जागांचे अंतर फारसे नाही. त्यामुळे प्रत्यक्ष निकालामध्ये नेमके कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT