MLC Election update : मोठी बातमी : विधानपरिषदेसाठी एकनाथ शिंदेंकडून दोन उमेदवारांची घोषणा

Shiv Sena MLC candidates, Bachchu Kadu nomination, Neelam Gorhe MLC : विधानपरिषदेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत. बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना लगेच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MLC election update : विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मागील काही दिवसांपासून अनेक नावे चर्चेत होती. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नावाचीही जोरदार चर्चा होती. त्यावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले आहे.

बच्चू कडू यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत कडू यांच्यासह नीलम गोऱ्हे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानुसार गोऱ्हे आणि कडू हे दोघे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असतील. मागील काही दिवसांपासून शिवसेना तिसरा उमेदवार देणार, अशीही चर्चा होती. त्यावरही आज पडदा पडला.

नीलम गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा कालावधी १७ मे रोजी संपणार आहे. त्या सध्या विधानपरिषदेच्या उपसभापतीही आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. अखेर शिंदेंनी उमेदवारी जाहीर करत गोऱ्हे यांच्यावरच पुन्हा विश्वास व्यक्त केला.

Eknath Shinde
Keshav Upadhye news : भाजपच्या सहा उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वीच केशव उपाध्ये मनातलं बोलले; म्हणाले, ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो...

बच्चू कडू यांचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यानंतर ते दिव्यांग आणि शेतकरी प्रश्नासाठी आक्रमक झाले होते. त्यांनी अनेकदा मोर्चेही काढले. विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कडू हे आपली प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करून उमेदवारी मिळविणार, अशी चर्चा होती. अखेर आज त्यांनी प्रहार संघटना विलीन करत स्वत: शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

Eknath Shinde
Top 10 News : 'राष्ट्रवादी'कडून उमेदवार जाहीर, बच्चू कडू शिवसेनेत, फडणवीस- शिंदेचं बिनसलं?, काँग्रेस धक्का देण्याच्या तयारीत... वाचा महत्वाच्या घडामोडी

शिवसेनेकडून तिसरा उमेदवार दिला जाणार, अशीही चर्चा होती. पण शिंदेंनी केवळ दोनच उमेदवारांची घोषणा करत या चर्चेवर पडदा पडला आहे. आता काँग्रेस काय भूमिका घेणार, यावर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com