Suvendu Adhikari, Mamata Banerjee (AI Image) Sarkarnama
देश

TMC MLA expelled : विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीसाठी दोन आमदारांच्या बनावट सह्या; खुद्द मुख्यमंत्र्यांनी नावे जाहीर करतातच दोघेही पक्षातून बडतर्फ

West Bengal fake signature case, CID investigation : तृणमूलने या दोन्ही आमदारांना पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत तातडीने पक्षातून बडतर्फ केले आहे.

Rajanand More

West Bengal politics : पश्चिम बंगालमधील सत्ता गेल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील आमदारांची नाराजी आता उघडपणे डोकं वर काढू लागली आहे. आता मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीच तृणमूल आणि पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या बॉम्ब टाकला आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दिलेल्या पत्रावर दोन आमदारांच्या बनावट सह्या करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी संबंधित दोन आमदारांची नावे जाहीर करत त्यांनीच आपल्याला चौकशी करण्याची विनंती केल्याचे म्हटले आहे. अधिकारी यांनी या आमदारांच्या खांद्यावर बंदूक ठेवत तृणमूलमध्ये सुरू असलेल्या गोंधळात भर टाकली आहे. संदीपान साहा आणि रिताव्रत बॅनर्जी अशी या दोन आमदारांची नावे आहेत.

तृणमूलने या दोन्ही आमदारांना पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत तातडीने पक्षातून बडतर्फ केले आहे. अधिकारी यांनी म्हटले आहे की, तृणमूलच्या भ्रष्टाचाराने केवळ बंगालमधील जनतेला लक्ष्य केले नाही तर आमदारांना यात ओढले आहे. पक्षाने त्यांच्याच पक्षाच्या दोन आमदारांच्या बनावट सह्या केल्या आहेत. तशी तक्रार त्यांनी केली आहे.

दरम्यान, सरकारने दोन आमदारांच्या तक्रारीनंतर सीआयडी चौकशी सुरू केली आहे. त्याबाबत काही आमदारांसह पक्षाचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांनी आजारपणाचे कारण देत चौकशीला जाणे टाळले आहे. मात्र, आता हे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

सीआयडीच्या एंन्ट्रीमुळे अभिषेक बॅनर्जी अडचणीत आले आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या आमदारांनी थेट त्यांचे नाव घेतले आहे. पक्षाचे सरचिटणीस म्हणून त्यांच्याकडेच आमदारांच्या सह्यांची जबाबदारी होती, असे या आमदारांनी म्हटले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पक्षातील नेत्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT