New Delhi News: एकाच दिवशी दोन राज्यांच्या राज्यपालांनी राजीनामा दिल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस आणि लडाखचे उपराज्यपाल कविंदर गुप्ता या दोन राज्यपालांनी गुरुवारी (ता.5 मार्च) राजीनामे दिल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी साडेतीन वर्षांत तर महिन्यांतच राजीनामा दिल्यानं देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही.आनंदा बोस यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला आहे. आर . एन. रवी यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
ममता बॅनर्जी यांच्या सरकारसोबत साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात रंगलेला संघर्ष आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दिलेला सी.व्ही. आनंद बोस यांचा अतिशय महत्त्वाची घटना मानली जात आहे.
तर दुसरीकडे कवींद्र गुप्ता यांनी केवळ 9 महिन्यांच्या कालावधीत राजीनामा दिला आहे. आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पण एकाच दिवसात दोन मोठ्या राज्यांच्या राज्यपालांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा केंद्र सरकार आणि राज्यांच्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेल्या सी.व्ही आनंद बोस यांच्यावर 2024 च्या मध्ये राजभवनातील एका महिला कर्मचाऱ्यानं लैंगिक छळाचा आरोप केल्यानं मोठी खळबळ उडाली होती. मात्र, बोस यांनी हे आरोप फेटाळून लावतानाच चौकशीची मागणी केली होती. या या आरोपांनंतर बोस आणि ममता सरकार यांच्यातला तणाव आणखी वाढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.