TMC video goes viral
TMC video goes viral  Sarkarnama
देश

TMC video goes viral : एक किलोमीटर दंडवत घालत तीन आदिवासी महिलांचा TMC मध्ये प्रवेश ; काय आहे प्रकरण ?

सरकारनामा ब्यूरो

TMC video goes viral bjp controversy : पश्चिम बंगालमध्ये तीन महिलांनी एक किलोमीटर दंडवत घालत तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजप नेत्यांनी या व्हिडिओवर जोरदार हल्लाबोल करीत तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे. यावरुन सध्या तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद सुरु झाला आहे.

टीएमसीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या तीन महिला एक किलोमीटर दंडवत घालत तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात आल्या होत्या. "प्रायश्चित्त म्हणून या महिलांनी हे सगळं केलं आहे," असे टीएमसीने म्हटलं आहे तर, यापूर्वी या तीनही महिला भाजपमध्ये होत्या. त्यांना टीएमसीमध्ये प्रवेश देताना पक्षाने ही शिक्षा दिली आहे, असे भाजपनं म्हटलं आहे.

"या महिला पहिल्यादांना भाजपमध्ये होत्या.त्यानंतर त्या टीएमसीमध्ये सामील झाल्या, दंडवत घालत येण्याची या महिलांची इच्छा नव्हती, पण भाजपमध्ये गेल्यामुळे त्यांना टीएमसीने ही शिक्षा दिली आहे," असा आरोप भाजपनं केला आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविया यांनी टि्वट करीत टीएमसीवर निशाना साधला आहे. "बालुरघाट येथील मार्टिना किस्कू, शिउली मार्दी, ठाकरन सोरेन या आदिवासी महिला आहेत.

कुठल्याही धार्मिक कामासाठी त्यांनी दंडवत घाललेले नसून टीएमसीची नेत्यानी त्यांनी ही शिक्षा दिली आहे," भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार (Sukanta Majumdar) यांनीही याबाबत संताप व्यक्त करीत टीएमसीला सुनावलं आहे.

महिला सुरक्षेबाबत ममता दीदीची ही पद्धत आहे का?

"टीएमसीने आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. टीएमसी ही आदिवासी समाजाच्या विरोधात आहे. या प्रकरणावरुन आदिवासी समाजाने टीएमसीच्या विरोधात आंदोलन केले पाहिजे, असे मजुमदार यांनी सांगितले.

भाजपा नेता खुशबू सुंदर यांनी व्हिडिओ शेअर करीत टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जींना जाब विचारला आहे. "हा आदिवासी महिलांचा अपमान आहे. महिला आणि त्यांच्या सुरक्षेबाबत ममता दीदीची ही पद्धत आहे का ?, असा प्रश्न खुशबू सुंदर यांनी उपस्थित केला आहे.

(Edited By Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT