Union Minister Shantanu Thakur with PM Narendra Modi Sarkarnama
देश

Shantanu Thakur : मोदींच्या मंत्र्यांनीच ‘बीफ’ वाहतुकीसाठी दिला पास; खुलासा करताना दमछाक...

Beef Transport West Bengal Modi Government Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी एक्सवर पोस्ट करत केंद्रीय मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Rajanand More

New Delhi : गोहत्या तसेच बीफ वाहतुकीवरून भाजपकडून सातत्याने हल्लाबोल केला जातो. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांनीच बीफ वाहतुकीसाठी पास दिल्याचे समोर आले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी बीफ वाहतुकीसाठी दिलेला पास सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यावरून राजकारणही तापलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा या सातत्याने भाजप नेत्यांवर निशाणा साधत आहेत. यावेळी त्यांनी ठाकूर यांनी दिलेला पास सोशल मीडियात पोस्ट करून वाद पेटवला आहे.

महुआ मोइत्रा यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ठाकूर यांच्या लेटरहेडचा फोटोही टाकला आहे. हा पास दोन जुलैचा असून 24 परगना जिल्ह्यातील जियारुल गाजी यांना तीन किलो बीफ नेण्यासाठी दिला आहे. महुआ यांनी या पोस्टमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना टॅग केले आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी भारत-बांग्लादेश सीमेवरील स्मगलर्ससाठी पास देत असल्याचा आरोप महुआ यांनी केला आहे. यावेळी त्यांनी तीन किलो बीफसाठी पास दिल्याचा आरोप महुआ यांनी केला आहे. शंतनू ठाकूर यांनीही पास दिल्याची कबुली दिली आहे.

ठाकूर यांनी पासवर खुलासा करताना बीएसएफवर आरोप केले आहेत. पास दिलेल्या भागातील बटालियनमधील काही लोक टीएमसीसोबत मिळाले आहेत. त्यामुळे तिथे पक्षपात होत आहे. टीएमसीशी संबंधित लोकांना राजकीय आश्रय मिळत आहे. या भागात संतुलन राखण्यासाठी मी पास दिला. बागदाह विधानसभा पोटनिवडणुकीमध्य नकारात्मक प्रचारासाठी हा मुद्दा उपस्थित केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे.

ठाकूर यांनी पास दिलेल्या जियारुल गाजी यांनाही पत्रकार परिषदेत आणले होते. तीन किलो बीफ खाण्यासाठी आणले आहे. हकीमपूर सीमेवर गावात सामान आणण्यासाठी बीएसएफला पास दाखवावा लागत असल्याचे गाजी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT