Mahua Moitra : महुआ मोइत्रांची खासदारकी पुन्हा जाणार? नवीन कायद्यातील ‘ते’ कलम करू शकते घात...

Delhi Police FIR New Criminal Law Rekha Sharma : भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 79 नुसार महुआ मोइत्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mahua Moitra
Mahua MoitraSarkarnama

New Delhi : राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता या नवीन फौजदारी कायद्यातील कलम 79 अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने महुआ यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे देण्यात आले आहे. महुआ मोइत्रा यांनी केलेले विधान अपमानास्पद आणि महिलांना सन्मानाने जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Mahua Moitra
Hemant Soren : हेमंत सोरेन यांची विरोधकांवर मात; जामीन, मुख्यमंत्रिपद अन् आता...

महुआ यांनी एक्सवर शर्मा यांच्याविषयी एक पोस्ट केली होती. वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. पण शर्मा यांनी महुआ यांची टिप्पणी गंभीरपणे घेत थेट पोलिसांत तक्रार करत तीन दिवसांत अहवालही मागवला आहे.

शर्मा यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनीही तातडीने नवीन कायद्यातील कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कलमाअंतर्गत दोषी व्यक्तीस तीन वर्षांपर्यंत शिक्षा वाढवली जाऊ शकते. तसेच दंडात्मक शिक्षेची तरतुदही या कलमांतर्गत आहे.

Mahua Moitra
Ramniwas Rawat : कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घ्यायला गेले अन् राज्यमंत्रिपदाची घेतली; पुढे काय झालं?

कोणत्याही न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यामध्ये लोकप्रतिनिधींना दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा दिल्यास त्यांची खासदारकी किंवा आमदारकी लगेच रद्द केली जाते. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार ही कारवाई होते. महुआ मोइत्रा यांना याप्रकरणात दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते.

मागील वर्षी लोकसभेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात पैसे या प्रकरणात त्या महुआ दोषी आढळल्या होत्या. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी याबाबत तक्रार केली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महुआ पुन्हा निवडून आल्या आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com