Shashi Tharoor  Sarkarnama
देश

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बोगस मतदान : शशी थरूर गटाचा आरोप!

Congress President Election : मल्लिकार्जून खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा (Congress President Election ) निकाल आता हाती आले आहे. मल्लिकार्जून खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र या निवडणुकीत मोठे ट्विस्ट आले होते. तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्या गटाने निवडणुकीतील अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला होता. थरूर यांचे निवडणूक प्रतिनिधी सलमान सोज म्हणाले, "आम्ही मधुसूदन मिस्त्री यांच्या कार्यालयाच्या सतत संपर्कात करत होतो. त्यांना अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर माहिती दिली आहे.

शशी थरूर यांच्या चार तक्रारी :

थरूर गटाच्या वतीने सोज यांनी चार तक्रारी दाखल केल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मतपेट्यांवरील अनधिकृत सील, मतदान केंद्रावर अनधिकृत लोकांची उपस्थिती, मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार आणि मतदान पत्रिका न मिळणे यांचा समावेश आहे.

थरूर यांच्या गटाने काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडे (CEA) दोन ते तीन तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, विविध राज्यांतील निवडणूक प्रक्रियेदरम्यान काँग्रेस मुख्यालयात नियमांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. एक प्रकरण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या केंद्राशी संबंधित असल्याचे वृत्त आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे येथे सर्वाधिक प्रतिनिधी आहेत.

राज्याचे प्रभारी मतदान केंद्रावर उपस्थित होते, अशी तक्रार थरूर यांच्या गटाने केल्याचे वृत्त आहे. तर निवडणूक समितीच्या प्रमुखांना मिस्त्री यांनी तसे न करण्यास सांगितले होते. द हिंदूच्या वृत्तानुसार, सीईएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “लखनऊमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तीन सचिव लखनऊमध्ये होते परंतु त्यांना मतदान करण्याची परवानगी नव्हती.

मतपेटीवरही तक्रार!

मतपेटी नीट हाताळली जात नसल्याची तक्रारही करण्यात आल्याचे वृत्त आहे. याशिवाय, पीसीसी नेते उघडपणे प्रतिनिधींना कोणाला मतदान करायचे, अशा सूचना देत असल्याच्या तक्रारी आहेत.

खर्गे यांना 7 हजार 897 मते :

खर्गे यांनी शशी थरूर यांचा जवळपास 7 हजार मतांनी पराभव केला. अधिकृत माहितीनुसार, खर्गे यांना 7 हजार 897 मते मिळाली. त्याचवेळी शशी थरूर यांना केवळ 1 हजार 72 मते मिळवता आली. 416 मते नाकारण्यात आली. मात्र, मतमोजणी सुरू असतानाच राहुल गांधी यांनी पक्षाचा नवा अध्यक्ष कोण होणार हे सांगितले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान आंध्रमधील पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले होते– आता माझी भूमिकाही खरगेजीच ठरवतील.

गांधी घराण्याकडेच 42 वर्षे पक्षाचे नेतृत्व :

खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष होणारे दुसरे दलित नेते आहेत. बाबू जगजीवन राम हे काँग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले दलित नेते होते. स्वातंत्र्यानंतर 75 पैकी 42 वर्षे पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याकडेच राहिले. त्याच वेळी 33 वर्षे पक्षाध्यक्षपदाचा सूत्रे गांधी घराण्याव्यतिरिक्त इतर नेत्यांकडे राहिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT