खालच्या पातळीवर बोलाल तर हल्ले होणारच : नितेश राणेंची प्रतिकीया!

Nitesh Rane : तुम्ही राणेंविरोधात बोलल्यावर त्याला प्रत्युत्तर मिळणारच.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. दोन नेत्यामधला, दोन पक्षांमधला वाद आता घरावर हल्ला करण्यापर्यंत आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर नितेश राणे यांची प्रतिक्रीया आली आहे. नितेश राणे म्हणाले, "खालच्या पातळीवरून बोलणार असाल तर कार्यकर्ते त्या त्या पद्धतीने रिअॅक्शन देणारच… कुणाकुणाला थांबवणार?" यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राणे यांच्यातला संघर्ष आणखी जास्त विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

या पद्धतीने राणेंच्या विरोधात बोलणार असाल तर कार्यकर्ते शांत बसत नाहीत. या राज्यात नारायण राणेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे. विरोधात बोलल्यावर कार्यकर्ते कुठपर्यंत शांत बसणार ? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhakar Jadhav) यांच्या निवासस्थानावर काल मध्यरात्री हल्ला करण्यात आला. चिपळूण (Chiplun) येथील घरावर मध्यरात्री दगडफेक झाली. बाटल्या फेकण्यात आले.

Nitesh Rane
Congress : कॉंग्रेसच्या सारथ्थ्यासाठी कुणाचा ‘हात’? गांधींचे विश्वासू खर्गे करणार थरूरांवर मात?

यावर संबंधी नितेश राणेंना विचारले असता ते म्हणाले, "हा हल्ला नेमका कुणी केला, कोणाकडून केला गेला, हे शोधणं पोलिसांचं काम आहे. पण या पद्धतीने तुम्ही राणेंविरोधात बोलल्यावर त्याला प्रत्युत्तर मिळणारच, असे नितेश राणे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला म्हणाले आहेत.

नितेश राणे पुढे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमचे नेते नारायण राणेंना या महाराष्ट्राट मानणारा मोठा वर्ग आहे. तुम्ही राजकीय टिका टिपण्णी करायची तर करा, पण खालच्या पातळीला जाऊन बोलणार असाल तर कार्यकर्ते त्या त्या पद्धतीने प्रत्युत्तर देणारच, कुणाकुणाला थांबवणार? असे राणेंनी म्हणाले.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर कठोर शब्दात टिका केली होती. या हल्ल्याचा याच्याशी काही संबंध आहे का? राजकीय वैमन्यस्यातून हा हल्ला झाला का ? असा संशय व्यक्त केला जात आहे.

Nitesh Rane
भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला, अज्ञातांनी दगड-बाटल्या फेकल्या : राजकीय संघर्ष घरापर्यंत!

या सर्व घडामोडींवर स्वत: भास्कर जाधव यांच्याकडून कसलीही प्रतिक्रिया अजूनही आलेली नाही. मात्र, या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजलेली आहे. जाधव हे मोठे राजकीय नेते आहेत. जिल्ह्यात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांच्या घरावर असा हल्ला करण्यात आल्याने परिसरात चर्चा सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com