Supreme Court hearing Sarkarnama
देश

Supreme Court Hearing on ShivSena : घटनापीठासमोरील 9 प्रश्न कोणते; त्यावरच येणार निकाल?

SC Final Decision Shiv Sena Controversy : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) लागणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court Hearing : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आज (ता. ११) लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार याचे उत्तर मिळणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांच्या नेतृत्वाखील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ या प्रकरणावर निकाल देणार आहे. सरन्यायाधीश निकाल वाचून दाखवणार आहेत.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक केस म्हणून महत्त्वाचे राहणार आहे. सत्तासंघर्षाच्या कायदेशीर लढाईत 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी सलग सुनावणी झाली होती. जून 2022 मध्ये प्रकरण सर्वोच्च न्यायालायता आले. मात्र, त्यावर 8 महिन्यांनी सुनावणी सुरु झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तीवाद केला होता.

तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह, राज्यपालांच्या वतीने तुषार मेहता यांनी युक्तिवाद केले होता. घटनापीठ आज त्यावर निकाल देणार आहे.

  1. आमदारांच्या अपात्रतेबाबत अध्यक्षांचा निर्णय पूर्ण होऊ शकला नसेल, स्थगित किंवा प्रलंबित असेल तर अशा स्थितीत न्यायालय तो निर्णय लागू करु शकते का?

  2. विधानसभा अध्यक्षांवर अपात्रते संदर्भातली याचिका प्रलंबित असेल तर त्या दरम्यान‌ सभागृहाची कार्यवाही कशी सुरु राहावी?

  3. जर पक्षांतर बंदी अध्यक्षांचा अपात्रतेचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू करायचा असेल तर त्या दरम्यान घडून गेलेल्या घटनांची संगती कशी लावायची?

  4. पक्षांतर बंदी कायद्यात एक तृतीयांश बहुमताची अटही वगळण्यात आली आहे त्याचा अर्थ काय?

  5. एखाद्या पक्षाचा व्हीप आणि गटनेता ठरवण्यात अध्यक्षांची भूमिका किती महत्त्वाची आहे. पक्षांतर बंदी कायद्याशी निगडित हे अधिकार अध्यक्ष कसे वापरु शकतात?

  6. व्हिप कुणी काढवा, राजकीय पक्षाने की, निवडणून आलेल्या आमदारांनी?

  7. पक्षाचे अंतर्गत निर्णय हे न्यायालयीन समीक्षेचा भाग होऊ शकतात की नाही?

  8. सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांचा अधिकार व त्याची मर्यादा नेमकी काय ते निर्णय न्यायिक समीक्षेअंतर्गत येऊ शकतात का?

  9. एखाद्या पक्षातल्या फुटी संदर्भात निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो का?

अपात्रतेची टांगती तलवार असणारे 16 आमदार कोण?

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

  2. मंत्री अब्दुल सत्तार

  3. मंत्री तानाजी सावंत

  4. यामिनी जाधव

  5. मंत्री संदिपान भुमरे

  6. भरत गोगावले

  7. संजय शिरसाट

  8. लता सोनवणे

  9. प्रकाश सुर्वे

  10. बालाजी किणीकर

  11. बालाजी कल्याणकर

  12. अनिल बाबर

  13. संजय रायमुलकर

  14. रमेश बोरणारे

  15. चिमणराव पाटील

  16. महेश शिंदे

    यांच्यासंदर्भात ही याचिका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT