Supreme Court Hearing : माझ्या विरोधात शिंदे गट तसेच विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दिला होता. ते केवळ पत्र होते. त्याबाबत पुढे कुठलीही कारवाई झाली नाही. हा प्रस्ताव मंजुर देखील झालेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याचा विषय पुन्हा सभापतींकडे आल्यास तो माझ्याकडे येऊ शकेल, असा दावा विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी केला. (Supreme court will give final verdict today on 16 MLA disqualify case)
शिवसेनेच्या (Shivsena) सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याच्या खटल्याची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालय (Supreme court) देणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी आपले मत मांडले.
ते म्हणाले, या संदर्भात निर्णय घ्यायची वेळ आल्यास तो विषय माझ्याकडे येईल. तत्कालीन अध्यक्ष असताना मी दिलेला निर्णय असल्याने हा विषय माझ्याकडे येईल, असे सांगून श्री. झिरवाळ म्हणाले, की मी निर्णय दिलेला असताना आताचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे अध्यक्ष नव्हते. त्याठिकाणी मी होतो. मी घेतलेल्या निर्णयाला त्यांनी हरकत घेतल्याने प्रकरण न्यायालयात गेले.
माझ्यावर अविश्वास आणला, परंतु तो सिद्ध झाला नाही. म्हणून तो प्रश्न येणार नाही. न्यायालयाचा निकाल महाराष्ट्रापुरता नव्हे, तर देशावर त्याचा परिणाम होईल. सोळा आमदार अपात्र ठरल्यावर सरकारला धोका असून मुख्यमंत्री अपात्र ठरल्यावर सरकार पडणार. त्यानंतर कोणाचे सरकार येणार हा भाग वेगळा आहे.
उर्वरित २४ आमदारांना निर्णय लागू होईल काय? यासंबंधाने श्री. झिरवाळ यांनी अद्याप त्याबाबत सांगता येत नसून निर्णय १६ आमदारांना लागू होईल, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, की जनता आणि घटनेचे महत्त्व यासाठी निकाल महत्त्वाचा आहे. निर्णय आल्यावर महाविकास आघाडी म्हणून निर्णय होईल. मात्र सध्या काही हालचाली नाही. त्याचबरोबर १६ आमदार अपात्र न झाल्यास कुणीही कोणत्याही बाजूस जाईल आणि स्वतंत्र गट स्थापन करेल. सध्यस्थितीत जनतेमध्ये सत्तासंघर्षाचा निकाल लागला पाहिजे, अशी भावना आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.