Rahul Gandhi | Bharat Jodo Yatra Sarkarnama
देश

Rahul Gandhi News: काश्मीरच्या जनतेने काय दिलं? बर्फवृष्टीत राहुल गांधींनी भाषणातून दिलं उत्तर

मी त्यांना माझ्या स्वेट शर्टचा रंग लाल करण्याची संधी दिली.

सरकारनामा ब्युरो

Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra : पक्षातील कार्यकर्ते आणि के.सी वेणुगोपाल यांनी मला काश्मीरमध्ये मी गाडीने प्रवास करण्याचा सल्ला दिला होता. मी काश्मीरमध्ये चालत गेलो तर माझ्यावर ग्रेनेड फेकला जाईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली होती. पण मी विचार केला की जे माझा तिरस्कार करतात त्यांना मी एक संधी द्यायला हवी आणि मी त्यांना ती दिली. मी त्यांना माझ्या स्वेट शर्टचा रंग लाल करण्याची संधी दिली. मी त्यांना माझ्या टी शर्टचा रंग बदलण्याची संधी दिली. पण मी जो विचार केला होता, तेचं झालं. काश्मीरच्या जनतेने माझ्यावर ग्रेनेड नाही फेकला, तर त्यांनी मला प्रेमाने अंलिगन दिलं, थोरा मोठ्यांनी प्रेमाने,आशिर्वादाने माझं स्वागत केलं. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी काश्मीरच्या जनतेचे आभार मानले आहे.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप होत आहे. काश्मीरमधील शेर-ए- कश्मीर मैदानात त्यांनी समारोपाचं भाषण केलं. यावेळी ते बोलत होते. ''मी हिंसाचार सहन केलाय, पाहिलाय, पण ज्यांनी हिंसाचार केलाय जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस त्यांना याबाबत काहीही माहिती नाही.''

जे हिंसाचार करतात, त्यांना त्याचं दुःख कळत नाही, पण मला या वेदना समजतात. ही वेदना मला अनेकदा समजली आणि जाणवली. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा समजू शकत नाही. पण मी समजू शकतो. जेव्हा मी अमेरिकेत होतो तेव्हा त्यांना एक फोन आला आणि मला सांगण्यात आले की त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली आहे. पण कोणत्याही जवानाच्या घरी असे कॉल्स जाणे मला थांबवायचे आहेत, असंही राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.

माझ्यावर हल्ला करणाऱ्यांकडून मी शिकलो आहे, मी त्यांचे आभार मानतो. मला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटत नाही. देशाचे विभाजन करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. पण द्वेषाने उभे नाही तर प्रेमाने उभे रहा. त्या विचारधारेचा आपण पराभव तर करणारच, पण त्यांच्या हृदयातून द्वेषपूर्ण विचारधाराही काढून टाकायचे आहेत, अशा भावना राहुल गांधींनी यावेळी व्यक्त केल्या.

मी अनेक वर्षांपासून रोज 8-10 किलोमीटर धावतो. अशा परिस्थितीत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालणे इतके अवघड जाणार नाही, असे मला वाटलं होतं. हा प्रवास सोपा होईल. तेव्हा मला माझ्यात तोडा अहंकार आल्यासारखं वाटलं. माझ्या लहानपणी फुटबॉलद खेळताना माझ्या गुडघ्याला दुखापत झाली होती. कन्याकुमारीहून प्रवास सुरू झाला तेव्हा गुडघ्यात थोड्या वेदना जाणवत होत्या, पण काश्मीरमध्ये आल्यावर या वेदना पुर्णपणे संपल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT