Bharat Jodo Yatra :'भारत जोडो यात्रे'च्या समारोपाला 21 पक्षांना आमंत्रण,नऊच राहणार उपस्थित; 'हे' आहे कारण?

Congress News : श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर यात्रेचा समारोप होणार..
Bharat Jodo Yatra In Kashmir
Bharat Jodo Yatra In Kashmir Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra: काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप होणार आहे. मागील वर्षी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा तब्बल 145 दिवसांच्या प्रवासानंतर श्रीनगरमध्ये पोहचली आहे. या ठिकाणीच शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर यात्रेचा समारोप होणार आहे. या भारत जोडो यात्रेच्या समारोपा तब्बल देशातील २१ प्रमुख पक्षांना आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, नऊच पक्ष यात सहभागी होण्याची शक्यता आहे.

भारत जोडो यात्रेचा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा आज (दि.३०) अखेरचा दिवस आहे. ही यात्रा तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेशमधून जम्मू-काश्मीरला पोहोचली आहे. या यात्रेत राहुल गांधी यांनी 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांतून जवळपास 3570 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या यात्रेच्या समारोप शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर श्रीनगर येथे समारोप होणार आहे.

या कार्यक्रमाचं देशातील प्रमुख अशा २१ पक्षांना आमंत्रण देण्यात आलं होतं. या पक्षांचे दिग्गज नेतेमंडळी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या पक्षांना निमंत्रण दिले होते.

Bharat Jodo Yatra In Kashmir
CM Eknath Shinde News Update: पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात बिघाड; काय आहे कारण?

एमके स्टालिन यांच्या नेतृत्वातील द्रविड मुन्नेत्र कड़गम (डीएमके), राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी (एनसीपी), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, सीपीआई (एम), सीपीआई, विदुथलाई चिरुथाइगल काची (वीसीके), केरळ कॉग्रेस, फारूक अब्दुल्ला यांच्या नेतृत्वातील नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांचा पीपुल्स डेमोक्रेटिक पक्ष (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समारोपाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

Bharat Jodo Yatra In Kashmir
Supriya Sule On Devendra Fadnavis: जमत नसेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे संतापल्या..

मात्र, राहुल गांधी यांच्या समारोप कार्यक्रमात काही प्रमुख राजकीय पक्ष उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष, अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टी यांसारख्या पक्षांचा समावेश आहे. पण या पक्षांनी सुरक्षेचं कारण देत या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com