Operation Bunyan al Marsus : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून नऊ ठिकाणी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये नऊ दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले. भारतीय लष्कराने या मोहिमेला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची चरपड झाली. त्यामुळे भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने आपल्या मोहिमेला 'ऑपरेशन बुनयान अल मरसूस' असे नाव दिले.
बुनयान अल मरसूसचा हा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो लोखंड किंवा शिशाने उभारलेली मजबूत भिंत. परंतु पाकिस्तानच्या मजबूत भिंत किती कमकुवत आहे हे भारतीय लष्कराने दाखवून दिले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तान तणावात भारतीय ड्रोन आणि लढाई विमाने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्ताने तीन एअरबेस नष्ट केले.
भारताच्या हल्ल्याने बुनयान अल मरसूसचा या नावाची खिल्ली पाकिस्तानमध्येच उडवली जात आहे. पाकिस्तानी लष्कर भारताचे हल्ले थांबवण्यात अपयशी ठरले असल्याचे पाकिस्तानमधील पक्ष तहरीक ए इन्साफकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे हल्ले थांबवू शकत नाहीत त्यामुळे तुरंगात असलेल्या इम्रान खान यांचा सोडण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.
भारताच्या हल्ल्यापुढे पाकिस्तान गर्भगळीत झाला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे फेल ठरताना दिसत आहेत. त्यामुळे इंग्लंडमध्ये उपचार घेत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे उपचार अर्धवट सोडून पाकिस्तानमध्ये दाखल झाले. त्यांनी पाकिस्तानला विनाकारण आक्रमक होऊ नका, शांत राहा, असा सल्ला दिला. त्यानंतर ते पाकिस्तान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयोजित केलेल्या बैठकीत देखील दाखल झाले.
पाकिस्तानने भारताची राजधानी दिल्ली टार्गेट करण्याच प्रयत्न केला. पाकिस्तानने शुक्रवारी दिल्लीवर फतेह 1 क्षेपणास्त्र डागले. मात्र, भारतीय लष्कराने हवेतच हे क्षेपणास्त्र नष्ट करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. पाकव्याप्त जम्मूमधून ड्रोन हल्ले करण्यात येत होते. तेथील दहशतवादी तळ आणि लाँच पॅड भारतीय लष्कराने ड्रोनच्या हल्ल्यात नष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.