MP Sanjay Raut News Sarkarnama
देश

MP Sanjay Raut On G-20 Summit : मोदींनी केलं त्यात नवल काय ? नेहरू, इंदिरा गांधींनी अशा बैठका घेतल्या आहेत..

National Politics : या परिषदेतून काय मिळणार आहे ? याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : दिल्लीत सुरू असलेल्या दोन दिवसीय जी-२० परिषदेची जगभरात चर्चा सुरू आहे. मोदी यांच्या सामर्थ्याचे हे चित्र असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे. (G-20 Summit News) तर दुसरीकडे विरोधकांनी मात्र मोदींच्या या जी-२० परिषदेच्या निमित्ताने काही प्रश्न उपस्थितीत करत टीका केली.

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर मोदींआधी अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बैठका पंडीत नेहरू, इंदिरा गांधी यांनी देखील त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात घेतल्या होत्या. (Pm Modi) मोदीही तेच करत आहेत, त्यात नवल काय? असे म्हणतानाच ही जी-२० परिषद आहे की, `मोदींची ट्वेन्टी ट्वेन्टी`, असा टोलाही लगावला.

जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगभरातील राष्ट्राध्यक्ष दिल्लीत दाखल झाले आहेत. (Maharashtra) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे ऋषी सुनक हे देखील या परिषदेसाठी आले आहेत. रशियाचे पुतीन आणि चीनचे जी शिनपिंग यांच्या अनुपस्थितीवरूनही विरोधकांनी मोदींवर टीकास्त्र सोडले.

काल दिल्लीत आयोजित शाही भोजनासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काॅंग्रेसच्या मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. यावर संजय राऊत म्हणाले, आज आपल्या भागावर चीनने अतिक्रमण केले आहे. त्यामुळे चीनचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेला आले नाही, याचा अर्थ सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे.

या परिषदेतून काय मिळणार आहे ? याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. लडाखची गेलेली अर्धी जमीन परत मिळणार असेल, देशावरील कर्जमाफ होणार असेल तर आम्ही बैठकीचे स्वागत करू. बैठकीमुळे भारताची ताकद जगात वाढली असेल तर त्याचही नक्की स्वागत करू.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT