G20 Summit News : जगभराच्या प्रमुखांसमोर मोदींनी देशाची करून दिली नवी ओळख; 'इंडिया' नव्हे 'भारत'...

PM Modi ON G20 Summit : . मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेच्या भाषणाची सुरुवात केली.
G20 Summit News
G20 Summit News Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi : देशाचे नाव इंडियावरून 'भारत' असे बदलण्याची सध्या चर्चा सुरू आहे, अशातच आजपासून सुरू झालेल्या G20 शिखर परिषदेत 'इंडिया' नावाचा वापर टाळण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करीत असताना त्यांच्या डेस्कसमोर 'भारत' असे नाव लिहिलेले होते. जगभरातील प्रमुखांचे स्वागत करताना मोदींकडून 'भारत' असाच उल्लेख करण्यात आला.

आज 'भारत मंडपम'मध्ये जगभरातील नेते उपस्थित आहेत. मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करून नरेंद्र मोदी यांनी G20 शिखर परिषदेच्या भाषणाची सुरुवात केली. त्यांच्या दुःखाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे मोदी म्हणाले.

G20 Summit News
NCP News : शरद पवार गटाच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला ; हल्लेखोराला नागरिकांकडून चोप

मोदींनी आफ्रिकन युनियनला G20 चा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव मंजूर केला. यावर परिषदेत पोहोचलेल्या आफ्रिकन युनियनच्या प्रमुख अजाली असोमानी यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

"जगात विश्वासाचे संकट निर्माण झाले आहे. एकविसावे शतक जगाला नवी दिशा देणारे ठरणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करून मानवतेचा विकास केंद्रस्थानी ठेवावा," असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.

G20 Summit News
MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत मोठी अपडेट ; पुढील आठवड्यापासून सुनावणी, पुरावे सादर करा..

मनमोहन सिंग, देवेगौडा उपस्थित राहणार...

आज सायंकाळी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवेगौडा यांनाही G20 शिखर परिषदेच्या डिनरसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आदी प्रमुख नेते G20 परिषदेत सहभागी झाले आहेत.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com