No Confidence Motion : Narendra Modi Government : Sarkarnama
देश

No Confidence Motion: अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान काय बोलणार? मोदी सरकार राहणार की जाणार?

No Confidence Motion Against Narendra Modi Government: संसदेत आज मोदी सरकारची कसोटी...

सरकारनामा ब्यूरो

LokSabha News: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरलं आहे. काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनीही काल (ता .१० ) आपल्या भाषणात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. दरम्यान, विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावावर मतदान होणार असल्याने, आज संसदेत सरकारची कसोटी लागणार आहे. (Latest Marathi News)

अविश्वास ठरावावर आज मतदान पार पडणार आहे. त्यामुळे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची आज संसदेत परीक्षा पार पडणार आहे. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर आज मतदान होणार आहे. यामुळे आजच्या या ठरावावरून कुणाकडे संख्याबळ हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मोदी सरकार राहणार की जाणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

2018 मध्ये अविश्वास ठराव आणला गेला होता?

त्यापूर्वी 2018 मध्ये मोदी सरकार विरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला गेला होता. यावेळी विरोधकांचे संख्याबळ126 होते आणि सरकारच्या बाजूने 325 मते पडली होती. संसदेत या ठरावावर जवळपास 12 तास चर्चा झाली होती.

अविश्वास ठरावावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

2018 मध्ये विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर नरेंद्र मोदी म्हणाले होते, "बदलत्या जागतिक वातावरणात आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. चर्चेत सहभागी झालेल्यांचे आभार. सर्वांसाठी मनापासून काम करण्याच्या उद्देशाने आम्ही येथे आलो आहोत. 2024 मध्येही विरोधकांनी पुन्हा एकदा अविश्वास ठराव आणावा, असं मी त्यांना सुचवतो."

अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय?

जेव्हा विरोधी पक्षांना असे वाटते की, सरकारला सभागृहात बहुमत नाही किंवा सरकारने सभागृहाचा विश्वास गमावला आहे, तेव्हा अविश्वास प्रस्ताव आणला जातो. या ठरावासाठी किमान ५० सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. हा ठराव मंजूर झाल्यानंतर सरकारला सभागृहात बहुमत असल्याचे सिद्ध करावे लागते. जेव्हा सरकार बहुमत सिद्ध करते तेव्हा अविश्वास ठराव नाकारला जातो, याउलट जर सरकारने बहुमत सिद्ध केले नाही तर सरकार कोळळते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT