Dhule NCP Office News: पक्ष कार्यालयावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात तुफान राडा; अखेर दोन टाळे लागले!

NCP Crisis News: "या परिसरात खुला भूखंड भवनासाठी मंजूर आहे.."
Ajit Pawar Sharad Pawar
Ajit Pawar Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Dhule Political News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडामुळे पक्षात दोन गट तयार झाले. यानंतर या दोन्ही गटात विविध पातळ्यांवर वेळोवेळी संघर्ष उफाळून आला. आता धुळे येथे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार व अजित पवार गटात जोरदार राडा झाला. अखेर पोलिसांनी दोन्ही गटाचे कुलूप लावून शरद पवार आणि अजित पवार यांच्या निर्णया नंतरच ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar Sharad Pawar
Pandharpur News : सरकारच्या कोटींच्या घोषणा; मात्र शेतकऱ्यांना काही मिळत नाही : जयंत पाटलांचा हल्लाबोल

कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते, शरद पवार गटाकडे असलेला ताबा अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कुलूप तोडून घेतला, त्यावेळी शरद पवार गटाचे कार्यकर्ते दाखल झाले. यामुळे तणावाची निर्माण झाली होती. यानंतर कार्यालयाला दोन्ही गटाचे कुलूप लावण्यात आले.

धुळे मिल परिसरात राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय गेल्या वीस वर्षांपासून आहे. शरद पवार चॅरिटेबल ट्रस्टकडे कार्यालयाचा ताबा आहे. या परिसरात खुला भूखंड भवनासाठी मंजूर आहे, ट्रस्टचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी अधक्षपदाचा राजीनामा दिला. ते भारतीय जनता पक्षात गेले.

Ajit Pawar Sharad Pawar
Arjun Khotkar On Atul Save : निधी वाटपावरून शिंदे गट-भाजपमध्ये बाचाबाची; अर्जुन खोतकर मंत्री सावेंवर गरजले!

भाजपात असलेले माजी आमदार अनिल गोटे हे राष्ट्रवादीत आले, त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले. ते या कार्यालयातून कारभार पाहू लागले. मात्र पक्षात गोटे यांचेही अंतर्गत वाद झाले. मंगळवार रोजी गोटे यांनी काही सामान वाहून नेत कार्यालयाचा ताबा सोडला असल्याचे सांगण्यात आले. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com