Odisha Train Accident :
Odisha Train Accident : Sarkarnama
देश

Odisha Train Accident : ओडीशा रेल्वे अपघाताला कोण देतंय धार्मिक रंग? ; पोलिसांचा कडक इशारा...

सरकारनामा ब्यूरो

Odisha Train Accident : ओडिशा पोलिसांनी बालासोर ट्रेन दुर्घटनेबाबत अफवा टाळण्याबाबत आवाहन केले आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले की, 'काही सोशल मीडिया वापरकर्ते या भीषण रेल्वे अपघाताला जातीय रंग देत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. ओडीशा पोलिसांनी एक ट्विट केले. या ट्विटमध्ये अपघाताचे कारण आणि इतर सर्व पैलूंचा जीआरपी, ओडिशाकडून तपास केला जात आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

ट्विट करत पोलिसांनी म्हटले आहे की, 'आम्ही सर्व लोकांना आवाहन करतो की, अशा खोट्या आणि द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट शेअर करण्यापासून दूर राहावे. अफवा पसरवून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.

'काही सोशल मीडिया हँडल्स या अपघाताबाबत अफवा पसरवत आहेत. अफवा पसरवून धार्मिक जातीय सलोखा बिघडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याच इशारा पोलिसांकडून दिला गेला आहे.

जखमींपैखी अनेकांना डिस्चार्ज :

दरम्यान ओडीशा बालासोर आणि इतर स्थानिक रुग्णालयात सुरुवातीला दाखल झालेल्या अनेक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कटक, भुवनेश्वर आणि कोलकाता यासह इतरही काही रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतांश मृतदेह भुवनेश्वरमधील केंद्रात हलवण्यात आले आहेत.

कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी दि. २ जून रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीला धडकली आणि तिचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. हा खूप भीषण अपघात होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT