Jairam Ramesh sarkarnama
देश

Jairam Ramesh News : इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण? दोन दिवसांत ठरवणार, काँग्रेस नेत्याने सांगून टाकलं

India Alliance : इंडिया आघाडीतील पक्ष पंतप्रधान कोणाचा यावरून एकमेकांशी भांडतील अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती.

Roshan More

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान संपले असले तरी अजूनही दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभेत इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही. ते सत्तेत आले तर पाच वर्षांत पाच पंतप्रधान करतील, अशी टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या पत्रकार परिषदेमध्ये इंडिया आघाडीत India Alliance येवढे नेते आहेत की प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान करतील, असे म्हटले होते. मात्र, आता काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीचा पंतप्रधान कोण असेल याचे उत्तर दिले आहे.

जयराम रमेश Jairam Ramesh म्हणाले, आम्ही लोकशाही प्रक्रिया मानतो. 2004 मध्ये आम्ही निवडणूका जिंकल्यानंतर मनमोहन सिंग हे पंतप्रधान झाले. त्या वेळी पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी चार दिवस लागले होते. मात्र, या वेळी दिवसही लागणार नाहीत. पंतप्रधान पदाच्या नावाची घोषणा दोन दिवसांत होईल. निकाल लागल्यानंतर सर्व खासदार MP एकत्रिक बसून निर्णय घेतील.

पंतप्रधान कोणत्या पक्षाचा

इंडिया आघाडीत 22 पेक्षा अधिक पक्ष असल्याचा दावा केला जातो आहे. इंडिया आघाडीतील पक्ष पंतप्रधान कोणाचा यावरून एकमेकांशी भांडतील अशी टीका भाजपकडून करण्यात आली होती. त्यामुळे पंतप्रधान कोणत्या पक्षाचा होणार याचे उत्तर देखील जयराम रमेश यांनी दिले आहे. जो सर्वात मोठा पक्ष असेल त्या पक्षाचा उमेदवार पंतप्रधान होणार, असे रमेश यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

आम्ही अहंकारी नाही

पंतप्रधान मोदींची कार्यशाली ही अहंकारी आहे. पंतप्रधाचा चेहरा आधीच ठरवून टाकायचा. आम्ही अहंकारी नाही. जो सर्वात मोठा पक्ष असेल त्या पक्षाकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार सांगितला जाईल. तो देशाचा पंतप्रधान असेल. 2004 मध्ये अशीच प्रक्रिया राबवली गेली होती, असे रमेश यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT