Nagar South Constituency : लोकसभा नगर दक्षिण मतदारसंघात (Nagar South Constituency) मतदान झालेली ईव्हीएम मशीन (EVM machine) ठेवलेल्या गोदामापर्यंत गेलेल्या व्यक्तीबरोबर नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची झालेल्या चर्चेचा व्हिडिओ माजी आमदार नीलेश लंके यांनी ट्विट करत प्रशासनाला निरुत्तर केलं. या व्हिडिओतून नीलेश लंके यांनी जिल्हा प्रशासनाने गोदामभोवती उभारलेल्या त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेमधील उणिवांवर बोट ठेवले.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन (EVM machine) ठेवलेल्या गोदामाला त्रिस्तरीय सुरक्षा आहे. येथे कोणीतीही पूर्व परवानगी शिवाय जाऊ शकत नाही. परंतु एक व्यक्ती गेली. बंदोबस्तावर असलेल्या सुरक्षा व्यवस्थेतील अधिकाऱ्यांची देखील याची माहिती नव्हती. ही व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर त्यावर माजी आमदार नीलेश लंके यांनी (Nilesh Lanke) आक्षेप घेतला. तसा व्हिडिओ ट्विट केला. यावर जिल्हा प्रशासनाने ही व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेरा पुरवठादार असल्याचे सांगितले. तसेच याशिवाय सुरक्षा रक्षक कर्तव्यावर दक्ष असल्याचे म्हटले. परंतु नीलेश लंके यांनी याबाबतचा आणखी एक व्हिडिओ ट्विट करत प्रशासनाने उभारलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाभोवती बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाच (Police) ही व्यक्ती कोण आहे, याची माहिती नाही. कोण आत गेले, कोण बाहेर आले याची त्यांना खबर नाही. ही व्यक्ती सीसीटीव्ही देखभाल दुरुस्तीचा दावा करीत आहे. पण त्या व्यक्तीला कोणता सीसीटीव्ही (CCTV) कोठे आहे याची माहिती नाही. आत जाणारी व्यक्ती एकटीच गेली की, सोबत तर कोणीच दिसत नाही. मग त्याने कोणाचा बंदोबस्त घेतला होत हे सांगता येईल का', असा प्रश्न नीलेश लंके यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे. Nilesh Lanke objection to the three tier security system of the warehouse where the EVM machine of Nagar South is kept
याशिवाय ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाभोवती त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था आहे. ही व्यक्ती आता गेल्याचे कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना माहित नाही. केवळ तुमच्या तोंडी आदेशाने अशा प्रकारे कोणालाही कसलीही कल्पना देता ती व्यक्ती गोदामाच्या शटरपर्यंत कशी जाऊ शकते? आणि जर विशेष पोलीस बंदोबस्तात गेली असेल तर त्याचे फुटेज तुम्ही जिल्हाधिकारी आहात म्हटल्यावर तुमच्याकडे सहज उपलब्ध होतील? ते सादर होतील का? असा देखील प्रश्न नीलेश लंके यांनी करून जिल्हा प्रशासनाला घेरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.