Sharad Pawar, Nitin Gadkari, Soniya Gandhi Sarkarnama
देश

Nitin Gadkari : पंतप्रधानपदाची ऑफर कोणी दिली होती, शरद पवार की सोनिया गांधी? नितीन गडकरी स्पष्टचं बोलले

Jagdish Patil

Nitin Gadkari News : भाजपचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मागील काही दिवसांत, विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने आपणाला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारल्याचा गौप्यस्फोट केला होता.

त्यांच्या गौप्यस्फोटाची चर्चा राज्यासह देशाच्या राजकारणात सुरु होती. अशातच आता त्यांनी पहिल्यांदाच एका मुलाखतीत बोलताना विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर कोणी दिली होती? यावर भाष्य केलं आहे.

तसंच पंतप्रधान होण्याच्या इच्छेवरही नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "माझी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही. जर मी त्या लायक असेल तर मला ते मिळेल, असं ते म्हणाले.

लोकसभा (Lok Sabha) निवडणुकी दरम्यान तुम्हाला पंतप्रधानपदाची ऑफर कोणी दिली होती? या प्रश्नावर उत्तर देताना, ते म्हणाले, अशा ऑफर देणाऱ्यांनाही मी विचारले की, 'तुम्हाला मला पंतप्रधान का करायचे आहे?' आणि मी म्हणालो की, 'हे माझ्या विचारसरणीशी जुळत नाही आणि माझी अशी कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही.

तर पंतप्रधान होण्याचा प्रस्ताव विरोध पक्षातील शरद पवार (Sharad Pawar) किंवा सोनिया गांधी यांनी दिला होता का? असं विचारलं असता ते म्हणाले, "आपण या विषयावर काहीही बोलणार नसून लोकांना कोणत्या चर्चा करायच्या आहेत ते त्यांना करुद्या. ते चर्चा करण्यास मोकळे आहेत", असं म्हणत त्यांनी प्रस्ताव कोणी दिला यावर स्पष्ट बोलणं टाळलं.

गडकरी नेमकं काय म्हणाले होते?

नितीन गडकरी पंतप्रदानपदाच्या ऑफरचा किस्सा सांगताना म्हणाले, "काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण त्याने मला सांगितलं की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ.

त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा? मी त्या त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्याचं ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि संघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी तत्त्वांशी तडजोड करणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT