Khalistani Sukha News  Sarkarnama
देश

Khalistani Sukha News : कॅनडामध्ये ठार झालेला खलिस्तानी कोण होता ? भारतासाठी होता धोकादायक...

Canada India Conflict : एनआयएच्या यादीत मोस्ट वाँटेड...

Chetan Zadpe

Canada News : खलिस्तानच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडात निर्माण झालेल्या तणावादरम्यान सुखदुलसिंग सुख्खा (Sukhdool Singh Sukkha) याची हत्या झाली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील सुख्खा गँगवारमध्ये मारला गेला आहे. खलिस्तान समर्थक गँगस्टर सुख्खा याची गँगवारमध्ये हत्या झाली. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

भारतासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे, कारण सुख्खा हा एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत होता आणि त्याने खलिस्तानी कारवाया करण्याचे काम केले होते. सुख्खाला कॅनडातील विनिपेगमध्ये अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर हल्लेखोर पसार झाले.

पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील सुखदुलसिंग ऊर्फ ​​सुखा दुनेका हा बनावट कागदपत्रांच्या मदतीने २०१७ मध्ये कॅनडाला पोहोचला होता. कुख्यात असलेल्या पंजाबमधील देविंदर बंबीहा टोळीशी त्याचा संबंध होता आणि गोल्डी ब्रार टोळीशी त्याचे शत्रुत्व होते. बंबीहा टोळीचे जाळे पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानपर्यंत पसरले आहे. ही टोळी खलिस्तान समर्थक मानली जाते आणि नंतर सुखा दुनेकाही खलिस्तानी घटकांसाठी काम करू लागला. एका रिपोर्टनुसार, हरदीपसिंह निज्जरच्या हत्येनंतर तो खलिस्तानी घटकांसाठीच काम करत होता.

खलिस्तानी अर्शदीपसिंगसोबत सुख्खा हा खलिस्तानी टायगर फोर्सला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करत होता. हरदीपसिंग निज्जर याच्याशीदेखील त्याचे संबंध होते. निज्जरची जूनमध्ये कॅनडातील गुरुद्वाराबाहेर हत्या करण्यात आली होती. सुख्खाचे कारनामे अतिशय विघातक स्वरूपाचे आणि धोकादायक होते. त्याच्यावर पंजाबमध्ये खून आणि इतर अनेक गंभीर गुन्ह्यांसह एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. त्याने कबड्डीपटू संदीपसिंग नांगल याचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पंजाबमधील दोन पोलिसांच्या मदतीने त्याने पासपोर्ट बनवला आणि नंतर बनावट कागदपत्रांच्या साह्याने भारतीय एजन्सीपासून वाचण्यासाठी कॅनडाला पळून गेल्याचे सांगितले जाते.

गोल्डी ब्रार टोळीवरही कारवाई, 1000 ठिकाणी छापे -

दरम्यान, पंजाबमध्येही पोलिसांनी गोल्डी ब्रार टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी एकाच वेळी 1000 ठिकाणी छापे टाकण्यात आले. याच टोळीशी संबंधित लॉरेन्स बिश्नोई यानेही सुख्खाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील 36 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

याबाबत डीएसपी तरसेम शाह म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात की, पंजाबमधून गुंडगिरी संपवायची आहे. त्यामुळेच आज आम्ही हा छापा टाकत आहोत. ही संपूर्ण कारवाई तरणतारण जिल्ह्यात करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 36 ठिकाणी आमचे छापे पडले आहेत."

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT