India Vs Canada : कॅनडा-भारत तणाव वाढला; मोदी सरकारचा मोठा निर्णय...

India Canada Conflict : कॅनडातील ज्या भागात भारतविरोधी घटना घडल्या आहेत...
India Vs Canada
India Vs CanadaSarkarnama

Delhi News : खलिस्तानच्या मुद्द्यावरून कॅनडासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. आत्तापर्यंत या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु कॅनडामध्ये व्हिसा केंद्र चालवणाऱ्या बीएलएस इंटरनॅशनलने आपल्या वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

या नोटीसमध्ये असे लिहिले आहे की, 'भारतीय मिशनकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. तणावाच्या कारणांमुळे भारत कॅनडा व्हिसा सेवा 21 सप्टेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहतील.' भारताच्या एका वरिष्ठ राजनैतिकानेही याला दुजोरा दिला आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

India Vs Canada
NCP Agitation : आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर भाजपने कारवाई करावी!

कोरोनाच्या संकटानंतर ही पहिलीच वेळ आहे. जेव्हा भारताने कोणत्यातरी एका देशातल्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाला जाणाऱ्या लोकांना सावध राहण्यास सांगितले होते. ज्या भागात भारतविरोधी घटना घडली आहे किंवा असे काही घडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी जाऊ नका, असा सल्ला भारत सरकारने दिला होता.

कॅनडामध्ये द्वेषपूर्ण गुन्हे वाढले असून, तेथे जात असताना सावध राहण्याची गरज असल्याचेही भारताने म्हटले आहे. 'कॅनडामध्ये गुन्हेगारी, भारतविरोधी कारवाया आणि द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन सर्व भारतीयांना कॅनडातील ज्या भागात भारतविरोधी घटना घडल्या आहेत, तिथे जाताना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आमचे अधिकारी कॅनडामध्ये असलेल्या लोकांच्या संपर्कात राहतील, असेही भारत सरकारने म्हटले आहे.

India Vs Canada
Bharat Vs Canada : भारत-कॅनडा वाद चिघळणार? अमेरिकेसह 'या' बड्या देशांचा कॅनडाला पाठिंबा

कॅनडाही भारतातून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना बोलावत आहे -

कॅनडाने आता भारतातील उच्चायुक्तालयातून आपल्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांना परत बोलावण्यास सुरुवात केली आहे. भारतातील आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धोका असू शकतो आणि त्यांना धमक्याही आल्या आहेत. अशा परिस्थितीत आम्ही कर्मचारी कमी करत आहोत, असे कॅनडाने म्हंटले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com