Bihar CM Nitish Kumar  Sarkarnama
देश

Bihar CM : नितीश कुमार राज्यसभेवर जाणार! भाजपची मोठी खेळी? आता बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी 'ही' नावं चर्चेत

Bihar CM : बिहारच्या राजकारणाचा आता नव्या दिशेनं प्रवास सुरु झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेची खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

Amit Ujagare

Bihar CM : बिहारच्या राजकारणाचा आता नव्या दिशेनं प्रवास सुरु झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेची खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. पण यामुळं आता बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पण नितीशकुमारानंतर आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत? हा मुख्यमंत्री जेडीयूचा असेल की भाजपचा? अशीही चर्चा सुरु झाली आहे. यासाठी काही संभाव्य नावं आघाडीवर आहेत.

बिहारच्या राजकारणात होळीच्या दिवशीच ही चर्चा सुरु होती की, आता राज्याचं नेतृत्व भाजप करु शकतं. त्यामुळं असंही म्हटलं जात आहे की, नव्या सरकारमध्ये जेडीयूचा उपमुख्यमंत्री होईल, यासाठी नितीशकुमार यांचे चिरंजीव निशांत यांच्या नावाची चर्चा आहे. सध्या सम्राट चौधरी हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनाच पुढे मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाऊ शकते. गेल्या अनेक वर्षांमध्ये चौधरी यांनी अनेक मंत्रीपदं सांभाळली आहेत.

यानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी दुसरं नाव समोर येतंय ते म्हणजे नित्यानंद राय! नित्यानंद राय हे सध्या केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत. केंद्रीय राजकारणात जाण्यापूर्वी राय हे बिहार भाजपचे अध्यक्ष होते. तसंच त्यांनी पक्ष संघटना मजूबत केली होती. हाजीपूरमधून ते चार वेळेस आमदार राहिले आहेत. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांना उजीअरपूर इथून खासदार म्हणून काम केलं.

चौधरी आणि राय हे मुख्यमंत्रीपदासाठीचे तगडे उमेदवार मानले जात असले तरी नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांच्या नावाची देखील चर्चा सुरु आहे. पण येत्या एक दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर बिहारमध्ये भाजपनं नितीश कुमार यांचा चेहरा वापरत मोठी खेळी करत बिहारची सुत्रे आपल्या हातात घेतल्यानं बिहारमध्ये नवं राजकारण सुरु होऊ शकते. पण यामध्ये जेडीयूला फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कारण नितीशकुमारांच्या समर्थकांनाच त्यांनी राज्यसभेवर जाण्याचा घेतलेला निर्णय पटलेला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT