Baramati NCP Politics : बारामती मधील 'या' संस्थेला अजितदादांचे नाव देण्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा विरोध

Baramati Medical College Name Change Controversy : बारामतीमधील एका मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आलं आहे. ते बदलून आता महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे नाव देण्याबाबतची चर्चा माझ्या कानावर आली आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 05 Mar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीमधील काही संस्थांना त्यांचं नाव देण्याबाबतची चर्चा सध्या सुरू आहे. बारामती मेडिकल कॉलेजला अजित पवारांचे नाव देण्याचीही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने त्याला विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली आहे.

बारामती मेडिकल कॉलेजचे नाव बदलण्यात येऊ नये आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव या मेडिकल कॉलेजला देऊ नका, अशी मागणी होळकर घराण्याचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भूषणराजे होळकर केली आहे. तसेच या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव आहे तसेच राहू द्या, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

याबाबत बोलताना भूषण राजे होळकर म्हणाले, "बारामतीमधील एका मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आलं आहे. ते बदलून आता महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचे नाव देण्याबाबतची चर्चा माझ्या कानावर आली आहे. अजित पवार नेहमीच धनगर समाजाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेत होते.

Ajit Pawar
Israel iran conflict : इराणवरील हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून भारतीय बंदरांचा वापर केल्याची चर्चा; अखेर पराराष्ट्र मंत्रालयाकडून भूमिका स्पष्ट

त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाफगावचा किल्ला ज्या किल्ल्याचा संवर्धनाचा प्रश्न अजित पवार यांनी तीन दिवसात मार्गी लावला होता. तसेच अनेक समाजा बाबतचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दादांनी वेळोवेळी हातभार लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर बारामती मेडिकल कॉलेजचं पुन्हा नामकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मात्र अजितदादांनी एका भेटी दरम्यान मला असं सांगितलं की, मी स्वतः बारामतीच्या मेडिकल कॉलेजला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देत आहे. परंतु आता त्याच कॉलेजला अजित पवारांचं नाव देण्याची घाट घातला जात आहे. हे दादांच्या विचारांना धरून आहे का ? ते दादांना मान्य झालं असतं का? याचा विचार करणे आवश्यक आहे.

Ajit Pawar
Priyanka Chaturvedi : राज्यसभेचे तिकीट नाकारले; आदित्य ठाकरे नाराज? प्रियांका चतुर्वेदींची पोस्ट, म्हणाल्या, जिंकून येणार...

तसंच हे नाव बदलून आपल्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का ? असा सवाल देखील भूषणराजे होळकर यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असा कधीच विचार नव्हता. त्यामुळे अजित पवारांचे नाव एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी आवश्यक आहे. जसं अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे. त्यामुळे बारामतीचं नाव अजितनगर ठेवला जाऊ शकत. तसेच पुरंदर येथे जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं त्याला अजित पवार यांचे नाव दिलं जाऊ शकतं.

मात्र असं दिलेली नाव बदलून वाद विवाद निर्माण करून समाजामध्ये तेढ निर्माण होईल या पलीकडे काहीच होणार नाही. अजितदादा असते तर त्यांची कधीच अशी इच्छा नव्हती त्यांनी हे कधीच केलं नसतं. अहिल्यादेवी होळकरांचं नाव काढून जातीय तणाव निर्माण करू नका. पक्षीय राजकारण न करता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मानसन्मान कसा राखता येईल आपण पाहुया", असं भुषणराजे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Parth Pawar
Shivnagar Vidya Prasarak Mandal Baramati
Jay Pawar
NCP leaders hold discussions over Rajya Sabha candidature amid speculation surrounding a former Shiv Sena UBT MP.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com