Sharad Pawar sarkarnama
देश

Karnatak Election 2023 : कर्नाटकात कोणाचं सरकार येणार? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं...

BJP - Congress Politics | कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Karnatak Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.  या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल लागणार आहेत. राज्यात निवडणुकीचा रणधुमाळी सुरु असून मोर्चे, सभांनी कर्नाटकात वातवरण निर्मीती झाली आहे. अशातच कर्नाटक निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) मोठं वक्तव्य केलं आहे.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार कर्नाटक विधानसभा निवडणुकांवर भाष्य केलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची चांगली शक्यता आहे. कर्नाटकात निवडणूक आहे आणि काँग्रेस जिंकेल असे माझे आकलन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भाजपने प्रचारात राष्ट्रीय मुद्द्यांशी राज्याच्या मुद्द्यांचा संबंध जोडला असला तरी कर्नाटक निवडणुकीकडे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकांच्या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ शकत नाही. देशात दोन प्रकारच्या निवडणुका होत असतात.  एक राष्ट्रीय पातळीवर आणि दुसरी राज्य पातळीवर. पण माझे वैयक्तिक मूल्यांकन असे आहे की राज्यांच्या निवडणुका हा एक वेगळा खेळ आहे."

आता आजच्या कांँग्रेसमध्य आणि जुन्या काँग्रेसमध्ये मोठा फरक आहे. तुम्ही काँग्रेसला दुर्लक्षित करु शकत नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये म्हणजे  केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणात बिगर भाजपा सरकार आहे. या राज्यांमध्ये सध्या बिगर काँग्रेस शासित किंवा बिगर भाजप शासित सरकारे आहेत. आता यात फक्त बिगर काँग्रेस लोकांना एकत्रित करावं लागेल. असं आमच्या काही सहकाऱ्याचं म्हणणं आहे.

पुढच्या महिन्या कर्नाटकमध्ये विधासभा निवडणुका आहेत. यात कोणाचा विजय होईल असा प्रश्न त्यांना विचारला असता, शरद पवार म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जिंकण्याची चांगली शक्यता आहे., कर्नाटकात निवडणूक आहे आणि काँग्रेस जिंकेल असे माझे आकलन आहे.

केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशमध्ये भाजपचे सरकार नाही. कर्नाटकात निवडणूक आहे आणि काँग्रेस जिंकेल असे माझे आकलन आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना काँग्रेसचे सरकार होते, परंतु आमदार तुटले आणि नंतर भाजपने सरकार स्थापन केले. राजस्थान, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल अशी अनेक राज्ये आहेत ज्यात बिगर भाजप सरकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Edited BY- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT