Pune By-Elelction: पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग; काँग्रेसकडून 'या' नेत्याचे नाव आघाडीवर

गेल्या आठवड्यात भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे.
Pune Loksabha By-Elelction:
Pune Loksabha By-Elelction:Sarkarnama

Pune By-Elelction : गेल्या आठवड्यात भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेसाठी आता भाजप आणि काँग्रेसमध्ये पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून (BJP) सुरुवातीपासून तीन नावांची चर्चा आहे. पण या तिघांपैकी एकालाच उमेदवारी मिळणार आहे.

दरम्यान, खासदार बापट यांच्या निधनानंतर दोन-तीन दिवसांतच भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नावाचे बॅनर लागले होते. त्यामुळे विरोधकांनी भाजपला चांगलच धारेवर धरलं होतं. त्यानंतर ते बॅनर काढण्यात आले. पण पुण्याच्या राजकीय वर्तुळात अजूनही पुण्यात कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. असे असतानाच आता भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरु झाली आहे.

Pune Loksabha By-Elelction:
Satara NCP : राष्ट्रवादी 'युवक'ने केला एप्रिल फूल दिनी मोदी सरकारच्या विकासाचा वाढदिवस

भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर सुरुवातील मेधा कुलकर्णी यांच्याही नावाची चर्चा होती. पण आता त्यांचही मागे पडलं आहे. पण विशेष बाब म्हणजे पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून कसब्याचे नवनिर्वाचीत आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर बहुमताने विजयी झाले. भाजपकडून ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. पण भाजपच्या हेमंत रासने यांना धोपीपछाड देत धंगेकरांचा विजय झाला. त्यानंतर आता काँग्रेस रवींद्र धंगेकर यांना पुण्याच्या पोटनिवडणुकीचं तिकीट दिल जाण्याचीही शक्यता आहे. तसेच, मोहन जोशी यांच्याही नावाची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com