Mallikarjun Kharge -Shashi Tharoor
Mallikarjun Kharge -Shashi Tharoor Sarkaranama
देश

Congress : कॉंग्रेसच्या सारथ्थ्यासाठी कुणाचा ‘हात’? गांधींचे विश्वासू खर्गे करणार थरूरांवर मात?

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान झाले. उद्या (ता. १९) दिल्लीत मतमोजणी होणार आहे. कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या माध्यमातून तब्बल २४ वर्षांनी कॉंग्रेस अध्यक्ष निवडला जाणार आहे. उद्याच्या निकालातून कॉंग्रेस अध्यक्ष थरूर (Shashi Tharoor) होणार की मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) होणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कॉंग्रेसाध्यक्ष कुणीही झाले तरी गांधी कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे लागणार असल्याचे कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील इतर राज्यातून सुमारे साडेनऊ हजार मतदारांनी मतदान केले. उद्या सकाळी दहा वाजता कॉंग्रेस मुख्यालयात मतमोजणीला सुरवात होणार आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास निकाल स्पष्ट होईल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस दुसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या जवळपास तीन वर्षापासून कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.

पक्षातील बहुसंख्य नेत्यांनी निवडणुकीची मागणी केली होती. या विषयावरून पक्षात बरीच चर्चा झाली. मात्र, देशातील सर्व राज्य कार्यकारिणीने अध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना दिले होते. मात्र, पक्षातील अनेक ज्येष्ठांच्या मनातील भावना लक्षात घेऊन सोनिया गांधी स्वत:ला मिळेलेले आधिकार न वापरता लोकशाही मार्गाने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबाच्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडून पक्षाध्यक्ष होण्यास टाळाटाळ केल्यानंतर पक्षाचे खासदार व कर्नाटकातील मोठे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे आले. खासदार शशी थरूर यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली. मात्र, प्रचारादरम्यान लक्षात आलेला कल पाहता खर्गे यांना अधिक संधी असल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT