Himachal Pradesh : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची आघाडी; पहिली उमेदवारांची यादी जाहीर

Himachal Pradesh : भाजपच्या यादीकडे लक्ष
Himachal Pradesh
Himachal Pradeshsarkarnama

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाने 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मंगळवारी सायंकाळी उशिरा पक्षाच्या वतीने उमेदवारांची घोषणा करण्यात आली. शिमला ग्रामीणमधून विक्रमादित्य सिंग, नादौनमधून सुखविंदर सिंग सुखू यांना तिकीट देण्यात आले आहे.

Himachal Pradesh
जयललितांचा मृत्यू कसा झाला? चौकशी आयोगाचा अहवाल समोर

निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर 8 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 17 ऑक्टोबर रोजी जारी केली जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर आहे. 27 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे.

Himachal Pradesh
मंत्रिमंडळ विस्ताराचे मुख्यमंत्र्यांकडून संकेत

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हिमाचलमधील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (CEC) बैठक दिल्लीत सुरू आहे. भाजपच्याही उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com