Harbhajan Singh: आम आदमी पार्टीच्या 10 पैकी 7 राज्यसभा खासदारांनी आपला गट नुकताच भाजपत विलीन केला. राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकार घडला, यामध्ये हरभजन सिंगचाही समावेश होता. ज्यावेळी हे विलिनिकरण घडून आलं त्यावेळी राजघव चढ्ढांबाबत अनेकांना धक्का बसला होता, पण त्याचबरोबर हरभजन सिंगचही नाव पुढे आल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. पण आता एका मुलाखतीत हरभजन सिंगनं आपण आपच्या कोट्यात राज्यसभेची खासदारकी मिळवली पण त्याचा राजीनामा न देता भाजपत का प्रवेश केला याचं कारण सांगितलं आहे.
आपला सोडचिठ्ठी देण्याचं प्रमुख कारण पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान असल्याचं हरभजन सिंगनं सांगितलं आहे. आपण आप सोडून भाजपत दाखल झालो कारण आपलं म्हणणं तिथं ऐकून घेतलं जात नव्हतं, असंही त्यानं सांगितलं आहे. या मुलाखतीत भाजपसोबत गेल्यानंतर आपल्या जालंधरच्या घराबाहेर झालेल्या निषेध आंदोलनावरही त्यानं भाष्य केलं. २०२२ मध्ये हरभजन सिंगला आम आदमी पार्टीनं राज्यसभेची उमेदवारी दिली होती. पण दोन महिन्यांपूर्वी २४ एप्रिल २०२६ रोजी त्यानं आपल्या सहा खासदार सहकाऱ्यांसह भाजपत प्रवेश केला आहे.
दरम्यान, भगवंत मान यांनीच आपल्याला आपमध्ये आणलं होतं, त्यांच्या विनंतीनुसार मी आपचा खासदार झालो. पण मी त्यांना त्याचवेळी हे स्पष्ट सांगितलं होतं की, आपण केवळ खेळाच्या बाबतीतच इथं चर्चा करणार राजकारणावर नाही, कारण राजकारण करणं हे आपलं काम नाही. केवळ पंजाबचं नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरील खेळांना प्रोत्साहन देण्याची संधी मला मिळाली होती त्यामुळं मी आपमध्ये प्रवेश केला होता. पण जेव्हा मी खेळांबाबत पक्षापुढे माझे विचार मांडले तर ते ऐकले गेले नाहीत. माझे विचार हे केवळ विचारच बनून राहिले. जर मी सुचवलेल्या गोष्टींबाबत छोटसं पाऊलही आपनं उचललं असतं तर मी पक्ष सोडला नसता. पण या पक्षात असण्याचा माझा हेतूच पूर्ण झाला नाही त्यामुळं मी पक्ष सोडला.
हरभजन सिंगच्या घराबाहेर झालेल्या निषेध आंदोलनावर विचारल्यानंतर त्यावर हरभजननं सांगितलं की, मी कोणाचं नाव घेणार नाही, पण हे समजून घ्यावं लागेल की आंदोलक कोण होते? सर्वांना माहिती आहे की ते लोक कोण होते आणि त्यांना कुठून आणलं गेलं होतं. यावर मला काहीही बोलण्याची गरज नाही, या देशातील आम आदमी मला माझ्या क्रिकेटमुळं ओळखतो आणि तितकंच मला प्रेमही देतो. ते माझा पुतळा का जाळतील? आणि माझ्या घराबाहेर गद्दर का लिहितील? मी कोणाबरोबर गद्दारी केलीए?
पण माझा आम आदमी पार्टीला प्रश्न विचारायचा आहे की, त्यांनी पंजाबच्या लोकांना दिलेल्या अश्वासनांचं काय झालं? तुम्ही पंजाबसाठी काय केलं? इथं गद्दार कोण आहे? माझं हृदय भारत आणि पंजाबसाठी धडकतंय. माझ्या मातृभूमीवर प्रेम करण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. त्यामुळं ज्यांना माझ्याविषयी काय बोलायचंय त्यांनी बोलत राहावं. मला यामुळं काहीही फरक पडत नाही. जर याचा माझ्यावर परिणाम व्हायला लागला तर मी माझं काम करु शकणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.