Hardik Patel Criticized on  Congress
Hardik Patel Criticized on Congress 
देश

'कॉंग्रेसला हिंदू धर्माच्या श्रद्धेचा तिरस्कार का?' हार्दिक पटेल कॉंग्रेस विरोधात आक्रमक

सरकारनामा ब्युरो

Hardik Patel On Congress

गांधीनगर : गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हार्दिक पटेल आता काँग्रेसविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. आज त्यांनी पुन्हा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. 'मी यापूर्वीही म्हटले होते की, काँग्रेस पक्षाने नेहमीच लोकांच्या भावना दुखावण्याचे काम केलं आहे. काँग्रेस नेहमीच हिंदू धर्माच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रयत्न करत असते. आज माजी केंद्रीय मंत्री आणि गुजरात काँग्रेसच्या नेत्याने राम मंदिरांच्या विटांवर कुत्रे लघवी करतात, असे विधान केले.

''मला काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना विचारायचे आहे की, भगवान श्रीरामाशी तुमचे काय वैर आहे? हिंदूंचा इतका द्वेष का? शेकडो वर्षांनंतर अयोध्येत भगवान श्रीरामाचे मंदिरही बांधले जात आहे, तरीही काँग्रेसचे नेते भगवान श्रीरामाच्या विरोधात वक्तव्ये करत आहेत,'' असे सवाल उपस्थित करत पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे.

'काँग्रेस जे करू शकली नाही ते मी साध्य करेन'

हार्दिक पटेल यांनी गुजरात काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून ते मोकळेपणाने आपली मते मांडताना दिसत आहेत. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, आपण कॉंग्रेसमध्ये राहून जे करु शकलो नाही ते सर्व काही आपण येणाऱ्या भविष्यात करणार असल्याचं म्हटलं आहे. गुजरातच्या जनतेच्या भल्यासाठी काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हार्दिक पटेलने काँग्रेस सोडल्यानंतर कोणत्या पक्षात प्रवेश केला आहे याचा खुलासा अद्याप केलेला नाही. मात्र ते काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. तर आपण आपला पुढचा मार्ग निश्चित केला असून त्याबाबत लवकरच सांगणार असल्याचंही हार्दिक पटेल यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT