शरद पवारांचे 'ते' फोटो व्हायरल केल्यानंतर राष्ट्रवादीचा पलटवार

NCP Replied MNS मनसे नेते सचिन मोरे यांनी त्यांच्या ट्विटरवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार ब्रिजभुषण सिंह यांचे फोटो शेअर केला आहे.
शरद पवारांचे 'ते' फोटो व्हायरल केल्यानंतर राष्ट्रवादीचा पलटवार

NCP Replied on MNS alligatins

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या सभेत अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीचं कारण सांगितले होते. आपल्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर मनसे नेते सचिन मोरे यांनी शरद पवार, बृजभूषण सिंह आणि सुप्रिया सुळे यांचे एका कार्यक्रातील फोटो शेअर करताना ट्विट करत "कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है." असे म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

या आरोपाला आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाइड क्रास्टो यांनी उत्तर दिलं आहे. "कुछ लोग डरते है और उस डर को छुपा ने के लिए फोटो मे बहाना ढूँढते है..." घाबरून अयोध्या दौरा रद्द केला, स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ अध्यक्षांचे कुस्ती स्पर्धेत टिपलेले फोटो ट्विट केले. "लेकिन ये पब्लिक है, ये सब जानती है." असं ट्विट करत त्यांनी मनसेला टोला लगावला आहे.

दरम्यान, मनसेने शेअर केलेले हे फोटो २०१८ मधील मावळ येथील कुस्ती स्पर्धेतील आहेत. मावळमध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेतील खासदार सुप्रिया सुळे यांनी ते त्यांच्या फेसबुकवर शेअर केले होते. तेच फोटो मनसेने ट्विट केले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी २०१८ मध्ये हे फोटो पोस्ट करताना म्हटलं होतं की, भारतीय कुस्ती संघ आणि नगरसेवक मयूर कलाटे व राष्ट्रवादीचे पुणे युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांनी पुण्यात आयोजित केलेल्या मातीतील वरिष्ठ गटाच्या पहिल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेस उपस्थित होते. यावेळी हरियाणाच्या विशाल कुमार यांनी चांदीची गदा मिळवत स्पर्धा जिंकली, असंल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

शरद पवारांचे 'ते' फोटो व्हायरल केल्यानंतर राष्ट्रवादीचा पलटवार
ब्रिजभुषण सिंहाना रसद कोणी पुरवली? मनसेकडून सुप्रिया सुळे, शरद पवारांसोबतचे फोटो ट्विट...

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली," असा गंभीर आरोप राज ठाकरे (raj thackeray) यांनी रविवारी झालेल्या सभेत केला.

राज ठाकरे यांचा अयोद्धा दौरा स्थगित झाल्यानंतरची ही त्यांची पहिली सभा होती. या सभेत राज ठाकरे (raj thackeray)काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष होत. या सभेत त्यांनी भाजप, खासदार संजय राऊत, राणा दांपत्य, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com