Indian Air Force jets take off for the ‘Sindoor’ operation, reflecting emotional symbolism. sarkarnama
देश

Operation Sindoor : घुसके मारा! पाकिस्तान विरूद्धच्या ऑपरेशनला 'सिंदूर' नाव देण्यामागे आहे भावनिक कारण

Why Air Strike Named Sindoor : मध्यरात्री एक वाजून 44 मिनिटांनी एअर स्ट्राईक करण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर'मधून घेण्यात आला

Roshan More

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारत काय कारवाई करणार याची उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला खुली सुट दिली होती. लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमधील मुजफ्फराबादमध्ये घुसून नऊ ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केले. या ऑपरेशला 'ऑपरेशन सिंदूर' नाव देण्यात आले होते.

मध्यरात्री एक वाजून 30 मिनिटांनी एअर स्ट्राईक करण्यात आली. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर'मधून घेण्यात आला. या ऑपरेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सिंदूर' नाव देण्यामागचे भावनिक कारण देखील समोर आले आहे.

दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये केलेल्या हल्ल्यात महिलांच्या समोर त्यांच्या पतींना गोळ्या घातल्या. महिलांना टार्गेट करण्यात आले. महिलांचे सौभाग्य त्यांच्या डोळ्यासमोरच उजाडण्यात आले. सौभाग्याच्या प्रतीक सिंदूर म्हणूनच या ऑपरेशनला सिंदूर हे नाव देण्यामागचा विचार असावा.

पाकिस्तान लष्कराची कबुली, आठ जणांचा मृत्यू

भारताने केलेल्या एअर स्टाईकनंतर पाकिस्तान लष्कराकडून सांगण्यात आले की सहा ठिकाणी 24 हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामध्ये आठ जणांचा मृत्यू आणि 33 लोक जखमी झाले आहेत.

'या' नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक

1. बहावलपूर

2. मुरीदके

3. गुलपूर

4. भीमबर

5. चक अमरू

6. बाग

7. कोटली

8. सियालकोट

9. मुजफ्फराबाद

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT