
Overview of Upcoming Nagpur Municipal Elections : सर्वेच्च न्यायालयाने महापालिकांसह मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभा एकत्रित लढणारी महायुती आणि महाविकास आघाडी महापालिकेच्या निवडणुकीत कायम राहणार का? याचीच सर्वाधिक चर्चा शहरात रंगली आहे. नागपूर शहरात भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षाचे प्राबल्य आहे. त्यामुळे या दोन्ही मोठ्या पक्षाला युती आणि आघाडी नको आहे. तसे संकेतही नेत्यांमार्फत दिल्या जात आहे.
२०१७च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०८ नगरसेवक निवडून आले होते. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस होती. त्यांचे २९ नगरसेवक होते. शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक निवडून आला होता. विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी एकही जागा सोडली नव्हती. महाविकास आघाडीचा शरद पवार यांच्यासमोर नाईलाज झाला होता.
काँग्रेसच्या कोट्यातीन पूर्व नागपूर विधानसभेची जागा शरद पवारांनी राष्ट्रवादीकडे खेचून आणली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झाला होता. याचा चांगलाच फायदा भाजपला झाला. भाजपचे कृष्णा खोपडे विक्रमी मतांनी येथून निवडून आले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दुनेश्वर पेठे यांना काँग्रेसची व्होटबँकसुद्धा राखता आली नाही. त्यामुळे आता काँग्रेसला आणखी धोका पत्करायचा नाही. १५० जागांवर निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसची आहे. आमच्याचकडे कार्यकर्त्यांची भरपूर संख्या आहे, असं सांगत मित्रपक्षांना वाटा देण्यास काँग्रेसचा आधीपासूनच नकार आहे.
दुसरीकडे भाजपचे चार आमदार शहरात आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने महापालिका निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांची संख्यासुद्धा सर्वाधिक भाजपकडे आहे. शेकडो कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी महापालिकेच्या १५१ जागाही भाजपला कमी पडत आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेचा एकही नगरसेवक सध्या शहरात नाही. त्यामुळे ‘सिटिंग-गेटिंग' हा फॉर्म्युला महायुतीला लागू होत नाही.
याचा फायदा भाजपने घेण्याचे भाजपने आधीपासूनच ठरवले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती करायची की नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना सोपवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.