TVK Congress Sarkarnama
देश

INDIA Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत 'टीव्हीके' गैरहजर, खरं कारण आलं समोर

TVK Congress : उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष दिल्लीत उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी ऑनलाईन माध्यमातून या बैठकीत सहभाग घेतला. मात्र, तमिळनाडूत काँग्रेस टीव्हीकेसोबत सत्तेत आहे. मात्र, तो पक्ष या बैठकीला हजर नव्हता त्याचे कारण समोर आले आहे.

Roshan More

TVK News : आज ‘इंडिया’ आघाडीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आघाडीतील २५ मित्रपक्षांच्या प्रमुखांनी आणि प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती. मात्र, दक्षिणेतील सुपरस्टार, तामिळनाडूचा मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नव्याने स्थापन झालेल्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाचा कोणताही प्रतिनिधी हजर नव्हता.

'टीव्हीके'ला प्रतिनिधी बैठकीला काँग्रेसने निमंत्रण दिले नसल्याचे समोर आले आहे. या बाबत काँग्रेसने निमंत्रण का नाही दिले याची स्पष्टीकरण दिले आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी केवळ संसदेत प्रतिनिधित्व असणाऱ्या (खासदार असलेल्या) पक्षांनाच आमंत्रित करण्यात आले होते.

ज्या पक्षांचा संसदेत एकही खासदार नाही, अशा पक्षांना या बैठकीचे निमंत्रण धाडण्यात आलेले नाही. थलपती विजय यांचा पक्ष या निकषात बसत नसल्यानेच त्यांना बोलावण्यात आले नव्हते, यात कोणताही राजकीय आकस नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष दिल्लीत उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी ऑनलाईन माध्यमातून या बैठकीत सहभाग घेतला आणि आपले मत मांडले. तर झारखंड मुक्ती मोर्चाचा प्रतिनिधी देखील ऑनलाईन उपस्थित होते.

डीएमके गैरहजर

तामिळनाडूतील 'डीएमके' पक्ष हा इंडिया आघाडीचा घटक होता. मात्र, तो या आघाडीला हजर राहिला नाही. काँग्रेसने तामिळनाडूच्या सत्ता संघर्षात टीव्हीकेला साथ दिली होती. ते सत्तेत देखील सहभागी झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीपासून डीएमकेने अंतर राखले आहे.

प्रमुख पक्ष उपस्थित

काँग्रेस, समाजवादी पक्ष (सपा), तृणमूल काँग्रेस (TMC), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आरजेडी यांसह आघाडीतील तब्बल २५ पक्षांचे नेते या बैठकीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उपस्थित होते. इंडिया आघाडीने आगामी रणनीती आखण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT