Pakistan Politics: Sarkarnama
देश

Pakistan Politics: इम्रान खान यांचं राजकीय करिअर संपणार? पाकिस्तान सरकार पुन्हा मोठं पाऊल उचलण्याचा तयारीत

Former PM Imran Khan | दोन आठवड्यांपुर्वी पाकिस्तान सरकारने इम्रान खान यांना अटक केली होती.

सरकारनामा ब्यूरो

Imran Khan's Party Will be Banned : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नसल्याचं दिसत आहे. दोन आठवड्यांपुर्वी त्यांना पाकिस्तान सरकारने अटक केली होती.पण पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या अडचणी कमी होतील असं वाटत होतं. पण आता खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षावरच बंदी घालण्याची तयारी पाकिस्तान सरकारने सुरु केल्याची माहिती समोरआली आहे. (Will Imran Khan's political career end? Pakistan government is preparing to take a big step again)

इम्रान खानच्या (Imran Khan) अटकेमुळे संपूर्ण देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आणि लष्करावरही हल्ला झाला. त्यामुळे देशाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे लोक, नेते आणि समर्थक यांनी मिळून पाकिस्तानचे लष्कर, पोलीस आणि सरकारी इमारतींवर हल्ला केला.देशभरात जाळपोळ, तोडफोड आणि दंगली घडवून आणल्या.असा आरोप पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. त्यामुळे आता सरकार पीटीआय'वर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.

इम्रान खान सतत देशाच्या लष्करावर निशाणा साधत आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणात लष्करप्रमुख आणि लष्कर आहे. ते सैन्याला आपला शत्रू मानतात. इम्रान खानचे संपूर्ण राजकारण लष्करापासून सुरू झाले आणि आज तेच इम्रान खान लष्कराला विरोध करत आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते, नेते आणि समर्थक लष्कराच्या मुख्यालयावर हल्ले करत आहेत. असे काम लज्जास्पद आहे. इम्रान खान यांचा पक्ष सोडलेले सर्व नेते या गोष्टी बोलत आहेत, असाही आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला आहे. (Pakistan Politics)

देशात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि जनतेला भडकावणे यासाठी इम्रान खान यांच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे, असे संरक्षण मंत्री आसिफ यांनी म्हटलं आहे. इतकेच नव्हे तर, इम्रान खान यांनी या हिंसाचाराचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा करत आहेत. पण त्यांच्याच सांगण्यावरुन देशात हा हिंसाचार, जाळपोळ करण्यात आल्यांच आसिफ यांनी दावा केला आहे. (International Politics)

पण दुसरीकडे,सरकारला काहीही करुन आपलं नुकसानच करायचं आहे. आपल्याला मारण्याचा कट रचला जात आहे. पण केवळ सर्वोच्च न्यायालयच देशातील लोकशाही वाचवू शकते, देशात ताबडतोब निवडणुका व्हाव्यात म्हणजे जनतेच्या मनात काय आहे, हे कळेल... असा खुलासा स्वत: इम्रान खान यांनी केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT