Imran Khan Arrested : पाकिस्तानी अभिनेत्रीचं Tweet चर्चेत ; मोदी अन् ROW च्या विरोधात तक्रार..; दिल्ली पोलीस म्हणतात...

Pakistani Actress Wants Complain Against Modi : लष्कराविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली आहे.
Pakistani Actress Wants Complain Against Modi news update
Pakistani Actress Wants Complain Against Modi news updateSarkarnama

Pakistani Actress Wants Complain Against Modi : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानमध्ये जाळपोळ होत असून यात एका अभिनेत्रीचं टि्वट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. मंगळवारी सांयकाळपासून इंटरनेटसेवा बंद असताना या अभिनेत्रीनं टि्वट कसं केलं, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांनी तिच्या टि्वटल सडेतोड उत्तर दिले आहे.

सहर शिनवारी (Sehar shinwari)असं या पाकिस्तानी अभिनेत्रीचं नाव आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तक्रार दाखल करायची आहे, मोदींनी पाकिस्तानात अराजकता आणि दहशतवाद पसरविला आहे," असे टि्वट शहर शिनवारी यांनी केलं होतं. या टि्वटला दिल्ली पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आहे. इम्रान यांच्या अटकेनंतर लष्कराविरुद्ध जनता रस्त्यावर उतरली आहे.

Pakistani Actress Wants Complain Against Modi news update
Karnataka Polls 2023 LIVE : गॅस सिलेंडरला नमस्कार करुनच मतदान करा ; मोदींच्या विधानाची काँग्रेसने करुन दिली आठवण..

सहर शिनवारी यांनी काल (मंगळवारी) टि्वट केलं आहे. "दिल्ली पोलिसांचा ऑनलाइन संपर्क कोणी देऊ शकेल का, मला भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय तपास यंत्रणा रॉ (RAW) यांच्याविरोधात तक्रार दाखल करायची आहे. पाकिस्तानात सध्या जी अराजकता, आणि दहशतवाद पसरविला जात आहे, त्याला मोदी आणि रॉ हे दोन्ही जबाबदार आहेत. भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र असेल तर मला विश्वास आहे की सुप्रीम कोर्टातून मला न्याय मिळेल,"

Pakistani Actress Wants Complain Against Modi
Pakistani Actress Wants Complain Against Modi Sarkarnma

दिल्ली पोलिसांनी सहरच्या टि्वटला उत्तर दिले आहे. पाकिस्तान हा आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. पण आम्हाला हे माहित करुन घ्यायचे आहे की आपल्या देशातील इंटरनेटसेवा बंद असताना आपण टि्वट कसे केलं.पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीमुळे इंटरनेट, टि्वटर, फेसबूक, यूट्यूब आदी सेवेवर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.

Pakistani Actress Wants Complain Against Modi news update
Karnataka Election 2023 : 'मोदी मैजिक चल रहा है..' ; BJP पूर्ण बहुमताने सत्तेत येणार : येदियुरप्पा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना काल (मंगळवारी) अटक करण्यात आली. यामुळे काल सांयकाळपासून पाकिस्तानात त्यांच्या समर्थकांनी अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यास सुरवात केली. यात १२ जणांना मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Pakistani Actress Wants Complain Against Modi news update
Karnataka Assembly Elections 2023 : लग्नाच्या मंडपात पोहचण्याआधी ती गेली थेट मतदान केंद्रात.. ; नारायण मूर्ती, प्रकाश राज यांनी..

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज देशभरातील खासगी शाळा बंद राहणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. देशातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अल कादिर विद्यापीठ घोटाळा प्रकरणी लष्कराने मंगळवारी इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केली. त्यानंतर देशभर जाळपोळ सुरु आहे. इम्रान खान यांची अटक बेकायदा असल्याचे पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या समर्थकांचे मत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com