Opposition PM Candidate
Opposition PM Candidate Sarkarnama
देश

Opposition PM Candidate : विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरला? अभिषेक बॅनर्जींचा मोठा दावा

सरकारनामा ब्युरो

भाजपसह देशभरातील विरोधी पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. एकीकडे केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी भाजप आग्रही आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्ष हे रोखण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागले आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कोणता चेहरा पंतप्रधान पदासाठी द्यायचा याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. विरोधकांकडून खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांच्यासह अनेक नावे पुढे येत आहेत.

असे असतानाच या विषयावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाच्या उमेदवार होणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, 'ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले पाहिजे. कारण एक तर त्या महिला मुख्यमंत्री आहेत, दुसरे म्हणजे त्या अजूनही भाजपविरोधात लढत आहेत. सर्व राजकीय पक्ष शांत झाले. पण ममता बॅनर्जी ईडी आणि सीबीआयपुढे झुकल्या नाहीत.

टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना जेव्हा विचारण्यात आले की, ममता बॅनर्जी केंद्राच्या राजकारणात गेल्या तर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री अभिषेक बॅनर्जी असतील का? या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, मी संघटनेतील माणूस आहे आणि त्यातच खूप आनंदी आहे. पण ममता बॅनर्जींनी काहीतरी मोठे करणे आवश्यक आहे, परंतु याचा अर्थ मला मुख्यमंत्री व्हायचे आहे असे नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT