Shivsena Symbol :
Shivsena Symbol :Sarkarnama

Shivsena Symbol : तुमाणेंनी फोडला बाँब : ठाकरेंचे 2 खासदार, 10 आमदार फुटणार असल्याचा दावा!

Shivsena Symbol : एकनाथ शिंदे नवे शिवसेना पक्षप्रमुख, त्यांचं नेतृत्वात मान्य!
Published on

Shivsena Symbol : मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकूण १८ खासदार होते. पोटनिवडणुकीत दादरा नगर हवेलीत कलाबेन डेलकर या १९ वे खासदार म्हणून निवडून आले.शिवसेनेतल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत यापैकी १२ खासदार गेले. १ खासदार नंतर शिंदे गटात सामील झाले. यामुळे ठाकरे गटाकडे सहा खासदार राहिल्याच्या दावा त्यांच्याकडून केला जात होता. मात्र, या सहापैकी आयोगाला प्रत्यक्षात ठाकरे गटाचे चारच खासदारांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. यामुळे राहिलेले दोन ठाकरेंचे खासदार फुटले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान शिंदे समर्थक व शिवसेना खासदार यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुमाणे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्यापैकी दहा आमदार व दोन खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गट म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे. शिवसेना पक्षाच्या नावावर असलेले कार्यालय आम्हाला मिळाले," असा दावा ही त्यांनी केला आहे.

Shivsena Symbol :
Thackeray Vs Shinde : शिवसेनेकडे उरले चारच खासदार; प्रतिज्ञापत्र देण्याचे टाळलेले पाचवे खासदार कोण?

तुमाने म्हणाले की, "शिवसेनेचा विजय झालेला आहे. निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. शिंदे साहेब हे नवे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. आम्ही शिंदेंच्या नेतृत्वात काम करत आहोत. आयोगाचा हा निर्णय अपेक्षित होता. सर्वोच्च न्यायालयातील निर्णयही आम्हाला अपेक्षित आहेत की, ते आमच्या बाजूने निकाल लागेल. आम्ही जिंकणार यात शंकाच नाही. शिंदेंच्या नेतृत्वात आमची वाटचाव राहणार आहे."

Shivsena Symbol :
Shivsena News : नाव गेले, चिन्ह गेले, ठाकरे गटाचे हे नेते काय करणार ?

"दसऱ्याच्या दिवशी दहा आमदार आणि दोन खासदार प्रवेश होणार होता. काही कारणांमुळे तो राहून गेला.गजाभाऊ किर्तीकर आमच्याकडे आले. तेरा खासदार आमच्यासोबत आले. आणखी दोन खासदार येणार आहेत.ते शिवसेनेच्या चिन्हावर लढलेत, शिवसेनेचे ते आहेत. त्यामुळे आता काही कायदेशीर अडचण राहिलेली नाही. लवकरच ते आमच्याकडे प्रवेश करतील, असेही तुमाणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com