PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM मोदींचे सल्लागार होणार नवे अर्थमंत्री? रिक्त जागेवर लढणार निवडणूक, सगळा प्लॅन ठरला! पुण्याशी आहे खास कनेक्शन

Sanjeev Sanyal: या नव्या अर्थमंत्र्याची प्रतिमा काँग्रेसच्या शशी थरुर यांच्यासारखी आहे. उच्चशिक्षित अर्थतज्ज्ञांबरोबरच ते वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही करतात, अर्थशास्त्रासह त्यांना इतिहासाचीही आवड आहे.

Amit Ujagare

Sanjeev Sanyal: पश्चिम बंगालमध्ये भाजपनं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर शुभेंदू अधिकारी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर आता दुसरं सर्वात महत्वाचं खातं म्हणजे अर्थखात्यासाठी संजीव सन्याल यांचं नाव पुढे आलं आहे. विशेष म्हणजे संन्याल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार आहेत. ते मूळचे कोलकात्याचे रहिवासी असले तरी मोठ्या काळापासून भारत सरकारशी जोडलेले आहेत. त्यांच्या पत्नीनं पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी प्रचारही केला होता.

पुण्याशी आहे कनेक्शन

संजीव सन्याल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) सदस्य आहेत. २०२२ मध्ये ते या परिषदेत सदस्य म्हणून नियुक्त झाले होते. त्यांचा भारत सरकारमध्ये सचिव स्तरावरचा दर्जा आहे. त्याचबरोबर ते पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटचे कुलपती देखील आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा वायदा केला होता. या घोषणेच्या पूर्ततेसाठी आता संजीव सन्याल यांचं नाव पुढे येणं हे महत्वाचं मानलं जात आहे.

जागतिक व्यासपीठांचा सन्याल यांना अनुभव

संजीव सन्याल यांची प्रतिमा काँग्रेसच्या शशी थरुर यांच्यासारखी आहे. उच्चशिक्षित अर्थतज्ज्ञांबरोबरच ते वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही करतात. अर्थशास्त्रासह त्यांना इतिहासाचीही आवड आहे. हिंदुत्वासंदर्भात त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून काम करताना भारताच्या आर्थिक सर्वेक्षणाचे सहा अहवाल तयार करण्यात हातभार लावला आहे. तसंच G7 तथा OECD च्या बैटकीत भारताचं प्रतिनिधीत्वही केलं आहे. संजीव सन्याल यांचं वय सध्या ५५ वर्षे असून ते एका प्रतिष्ठीतून कुटुंबातून येतात. साहित्य संमेलनांनंतर विविध आर्थिक व्यासपीठांवर ते आपली भूमिका मांडत असतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT