NEET Paper Leak Case : NEET पेपर फोडणारा मास्टमाईंड प्रा. कुलकर्णीनंतर पुण्यातीलच एका जीवशास्त्राच्या प्राध्यापिकेलाही अटक

NEET Paper Leak Case: NEET पेपरफुटीप्रकरणी आता कसून तपास केला जात असून घडामोडी वेगानं घडायला लागल्या आहेत.
NEET Paper Leak Mastermind Prof. P V Kulkarni and Prof. Manisha Mandhare
NEET Paper Leak Mastermind Prof. P V Kulkarni and Prof. Manisha Mandhare
Published on
Updated on

NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटीप्रकरणी आता कसून तपास केला जात असून घडामोडी वेगानं घडायला लागल्या आहेत. कालच या प्रकरणातील मास्टरमाईंड माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज आणखी एका महिला प्राध्यापिकेला पुण्यातूनच अटक झाली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. NEET ची परीक्षे घेणाऱ्या NTA च्या पॅनलमध्ये या प्राध्यापिकेचा समावेश होता.

NEET Paper Leak Mastermind Prof. P V Kulkarni and Prof. Manisha Mandhare
Ashok Kharat: खरातच्या स्वीय सहाय्यकाच्या मृत्यू अन् संशयाचा धूर! मंत्र्यांकडं इशारा करत सुजात आंबेडकरांचा धक्कादायक दावा

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, ताज्या कारवाईमध्ये प्रा. मनिषा मांढरे या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रा. मांढरे या जीवशास्त्राच्या वरिष्ठ प्राध्यापिका आहेत. पेपर सेट करण्याच्या पॅनेलमध्येच या प्राध्यापिकेचा समावेश होता. प्राथमिक चौकशीनंतर अखेर प्रा. मांढरे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

NEET Paper Leak Mastermind Prof. P V Kulkarni and Prof. Manisha Mandhare
Ashok Kharat: खरातच्या स्वीय सहाय्यकाच्या मृत्यू अन् संशयाचा धूर! मंत्र्यांकडं इशारा करत सुजात आंबेडकरांचा धक्कादायक दावा

नेमका आरोप काय?

प्राध्यापिका मनिषा मांढरे यांनी NEET परीक्षेसाठी विशेष कोचिंग क्लासेस चालवले होते. तसंच या परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची आधीच माहिती या दोघांनी विद्यार्थ्यांना दिली होती. तसंच पाठ्यापुस्तकात या प्रश्नांची नोंद करण्यासही त्यांनी सांगितलं होतं, असा आरोप सीबीआयनं केला आहे. त्यामुळं आता या दोघांची सखोल चौकशी झाल्यानंतर याचे धागेदोरे आणखी कोणाजवळ जातात हे पाहावं लागणार आहे.

पुण्यातील दोन आरोपींना दिल्लीच्या कोर्टात केलं हजर

दरम्यान, यापूर्वी पुण्यातून अटक करण्यात आलेला प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि ब्युटीपार्लर चालवणारी व्यावसायिक महिला मनिषा वाघमारे या दोघांना सीबीआयकडून आज दिल्लीच्या रोझ अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. या दोघांना १४ दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली असून याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. संध्याकाळी ५ वाजता हा निर्णय घोषित केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com