sanjay raut-utpal Parrikar
sanjay raut-utpal Parrikar sarkarnama
देश

राजकारणात हिंमत दाखवावी लागते म्हणत शिवसेनेने उचकवले पर्रीकरांच्या मुलाला!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उत्पल पर्रीकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी गोव्यात भारतीय जनता पक्षाला एक स्थान निर्माण करून दिले आहे, त्यामुळे हे उत्पल पर्रिकर यांच्यावर अवलंबून आहे की, त्यांनी काय करावे. शेवटी राजकारणात हिंमतीने, धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेनेचे (shivsena) प्रवक्ते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले. (Will Shiv Sena give ticket to Manohar Parrikar's son? Sanjay Raut said...)

गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडी करण्याबाबत सूतोवाच केले आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल यांनी भाजपकडे तिकिटाची मागणी केली आहे. मात्र, त्यांना पक्षाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यावरून उत्पल पर्रीकर यांना शिवसेना तिकिट देणार का, असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले.

खासदार राऊत म्हणाले की, दादरा नगर हवेलीमध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकलो. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांचे संपूर्ण कुटुंबीय शिवसेनेत आले आणि आम्ही संपूर्ण ताकद पणाला लावली. जर पर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेना नक्कीच त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल.

उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी गोव्यात भारतीय जनता पक्षाला जनमाणसांत स्थान निर्माण करुन दिले आहे. त्यांनीच भाजप गोव्यात रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्ष त्यांच्याच प्रतिमेवर टिकला आहे. नाही तर भाजप हा गोव्यात आयाराम गयारामवरच होता, त्यामुळे हे उत्पल पर्रिकरांवर अवलंबून आहे की, त्यांनी काय करावे. शेवटी राजकारणात हिंमतीने, धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतात. शिवसेना हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाला मुख्य पर्याय म्हणून लोक शिवसेनेचा विचार भविष्यात करतील, असे मला वाटते, असा विश्वासही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गोव्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. ता. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने आपले उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आयाराम-गयारामांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT