Nitish Kumar  Sarkarnama
देश

Bihar Reservation: बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढणार ? मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी घोषणा

Ganesh Thombare

Bihar News: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी मोठी घोषणा केली. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून आता 75 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचा प्रस्ताव त्यांनी बिहारच्या विधानसभेत मांडला. या वेळी बिहार सरकारने राज्यातील जातीनिहाय केलेल्या जनगणनेचा अहवाल त्यांनी विधानसभेत सादर केला.

नितीश कुमार यांनी विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावामध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षणाचा समावेश करून त्यामध्ये 75 टक्क्यांपर्यंत मर्यादा वाढवण्यात येऊ शकते, यासंदर्भात चर्चा झाली.

या प्रस्तावानुसार, आता 'एससी'साठी असलेल्या 16 टक्के आरक्षणाची मर्यादा आता 20 टक्के करण्यात येईल, तर 'एसटी'चे आरक्षण 1 टक्क्यांवरून आता 2 टक्के करण्यात येईल, तसेच ईबीसी व ओबीसी मिळून 43 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली जाऊ शकते, असा प्रस्ताव त्यांनी मांडला.

नितीश कुमार यांनी आरक्षणाची व्याप्ती वाढवण्यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावावर विधानसभेत अजून सविस्तर चर्चा होणार आहे. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय होणार आहे, तर काही दिवसांपूर्वी बिहार सरकारकडून जातीनिहाय जनगणना करण्यात आली. त्यानंतर विरोधकांकडून बिहार सरकारवर टीका करण्यात आली. मात्र, आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मोठी घोषणा केली आहे.

नितीश कुमारांचं वादग्रस्त वक्तव्य

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी विधानसभेत जातीवर आधारित सर्वेक्षणाची आकडेवारी सादर केली. मात्र, या वेळी लोकसंख्येच्या नियंत्रणाबद्दल आणि महिलांच्या साक्षरतेबाबत बोलताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. लोकसंख्याही नियंत्रणात आणण्यासाठी नितीश कुमारांनी उदाहरण दिले, त्या उदाहरणावरून महिला आमदारांनी नाराजी व्यक्त केली.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT