MP Assembly Election : मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघाचा असाही इतिहास; येथे निवडून येणाऱ्या पक्षाची येते सत्ता

Assembly Election News : मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघाचा इतिहास वेगळा आहे.
MP Assembly Election
MP Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Madhya prdesh vidhan sabha Election : मध्य प्रदेशात गेल्या २० वर्षांहून अधिक काळ राज्यात भाजपची सत्ता असली तरी यावेळेसची निवडणूक रंगतदार ठरत आहे. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार असल्याने भाजप व काँग्रेसचा कस लागणार आहे.

मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघाचा इतिहास वेगळा आहे. या ठिकाणी निवडून येणाऱ्या पक्षाची सत्ता राज्यात येते, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या ठिकाणच्या निवडणुकीकडे आहे. विशेष म्हणजे येथील एकही आमदार दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. प्रत्येक निवडणुकीत नवीनच चेहरा विधानसभेत जातो, त्यामुळे या मतरदारसंघातील निवडणुकीची सर्वत्र चर्चा असते.

MP Assembly Election
Arvind Kejriwal News : मुख्यमंत्री केजरीवाल चालवणार जेलमधून दिल्ली सरकार ? आपच्या आमदारांचा मोठा निर्णय...

बैतुल मतदारसंघाचा 1990 पासूनचा इतिहास पहिला, तर गेल्या 33 वर्षात ही परंपरा कायम राहिली आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथील एकही आमदार दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही. या मतदारसंघातून 1990 मध्ये भाजपचे भगवंत पटेल विजयी झाले होते. त्यावर्षी भाजपचे सुंदरलाल पटवा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने (BJP) सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 1993 मध्ये काँग्रेसचे अशोक साबळे विजयी झाले होते तेव्हा दिग्विजय सिंग यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार आले होते.

1998 मध्ये काँग्रेसचे (Congress) विनोद डागा यांना मोठा विजय मिळवला होता. त्यामुळे पुन्हा दिग्विजय मुख्यमंत्री झाले होते. 2003 मध्ये भाजपचे शुभप्रसाद राठोड आमदार झाले. त्यावेळी भाजपच्या उमा भारती यांच्या नेतृत्वात भाजपने सरकार स्थापन केले होते. 2008 मध्ये भाजपचे अलकेश आर्य विजयी झाले होते. त्यावेळी भाजपचे शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा सत्ता मिळवली होती.

2013 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचे हेमंत खंडेलवाल आमदार झाले आणि त्यानंतर शिवराज सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, असा या मतदारसंघाचा इतिहास आहे. त्यामुळे 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप, की काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

MP Assembly Election
Bharat Jodo Yatra: राहुल गांधी पुन्हा 'भारत जोडो यात्रा' काढणार ? काँग्रेसने आखला मोठा 'प्लॅन'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com