Balwant Wankhede with Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Balwant Wankhede in Parliament : यशोमतीताईंची दिल्लीतही सेटिंग, वानखेडे थेट खर्गेंच्याच शेजारी!

Mayur Ratnaparkhe

Parliament session 2024 : अमरावतीत नवीनीत राणा, रवी राणांचे राजकारण संपवण्यासाठी निघालेल्या यशोमती ठाकूर यांनी आपले समर्थक आमदार बळवंत वानखेंडंना खासदार करून दाखवले. यशोमतीताईंच्या साथीने राणांना हरविल्यानांतर वानखडेंचा कॉन्फिडन्स वाढला आहे.

खासदार झाल्यानंतर थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून कार्यलायाचा ताबा घेतला. त्यानंतर संसंदेच्या पहिल्या अधिवेशनासाठी वानखेडे दिल्लीत गेले.

कार्यकर्ता असल्यापासून ते खासदार होईपर्यंत यशोमतीताईंची(Yashomati Thakur)भक्कम साथ मिळालेल्या वानखेंडेंनी दिल्लीतही हवा केली. मोदी-शाहांच्या विरोधकांनी पुकारलेल्या आंदोलनात वानखेडे थेट खर्गेंच्या शेजारी उभे राहिले आणि विरोधकांचा आवाज चढवला.

दिल्लीत पहिल्याच दिवशी वानखेड खर्गेंच्या शेजीरी दिसल्याने अनेकांच्या भूवया उंचावणे साहिजक आहे. यशोमताईंचा दबदबा असल्याने वानखेडे थेट खर्गेंच्या भोवती दिसले, अशी चर्चा सुरू आहे.

बळवंत वानखेडेंनी काय म्हटलं आहे? -

खासदार बळवंत वानखेडे(Balwant Wankhede) यांनी संसदेतील पहिल्या दिवशीच्या भावना ट्वीटद्वारे व्यक्त केल्या आहेत. 'जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिरात आज प्रवेश करताना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेल्या संविधानासमोर नतमस्तक झालो. हा मान मला अमरावती जिल्ह्याने दिला त्याबद्दल समस्त अमरावतीकर जनतेचे मनःपूर्वक आभार.' असं ते म्हणाले आहेत.

याशिवाय 'हा मान माझ्या एकट्याचा नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक सुजाण आणि संवेदनशील नागरिकाचा बहुमान आहे. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा प्रतिनिधी म्हणून या लोकशाहीच्या मंदिरात लोकहिताचे निर्णय घेण्यामध्ये आणि कायदे करण्यामध्ये माझा सहभाग मी नक्की देईन. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नासाठी संसदेत मी प्राणपणाने बाजू मांडून लढण्याचा प्रयत्न करीन. अशी ग्वाही या निमित्ताने देतो.' असंही वानखेडेंनी बोलून दाखवलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT